Free Education Helpline For Girls: मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास ‘या’ हेल्पलाइन नंबरवर संपर्क करा

187
Free Education Helpline For Girls: मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास 'या' हेल्पलाइन नंबरवर संपर्क करा
Free Education Helpline For Girls: मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास 'या' हेल्पलाइन नंबरवर संपर्क करा

वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलींचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्यात येत असून या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक (Higher Education Department Helpline No) व हेल्प डेस्क सुरू केला आहे.ही हेल्पलाईन ०७९६१३४४४०,०७९६९१३४४४१ या क्रमांकावर आणि helpdesk.maharashtracet.org यावर संपर्क करावा.तसेच ही हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत कार्यरत असून या हेल्पलाईनचा उपयोग करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) म्हणाले,या योजनेसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच राज्यातील शासकीय महाविद्यालये,शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने,सार्वजनिक विद्यापिठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे/स्वयं अर्थ सहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्याक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना वार्षिक शैक्षणिक व परीक्षा शुल्क या योजनेद्वारे १०० टक्के मोफत करण्यात आले आहे.

(हेही वाचा – मराठा आरक्षण केंद्राचा विषय असल्याने Sharad Pawar आंदोलन थांबवण्याचा सल्ला देणार का? उमेश पाटील यांचा सवाल)

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व त्यापूर्वी ज्या मुलींनी प्रवेश घेतलेला आहे, आणि सध्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या मुलींना अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ मिळणार असून ज्या विद्यार्थीनींनी प्रवेशासाठी पैसे भरले असतील त्यांना भरण्यात आलेले पैसे परत करण्यात येतील. त्यासाठी पात्र मुलींना रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी त्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी येथे खास नमूद केले.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला असून काही कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – Munawar Faruqui याच्याकडून मराठी माणसाचा अवमान; मनसेचा विरोध)

मंजूर शिष्यवृत्ती सत्र निहाय दोन टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाणार असून शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थीनी पात्र असणार आहे,असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.