भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. एखाद्या समाजाच्या मागणीवरून अशी व्यवस्था केली जाऊ शकत नाही. (Gauhati High Court) नमाजपठणासाठी मशिदी आहेत. ज्याला नमाजपठण करायचे आहे, त्याने तेथे जावे, अशा शब्दांत गुवाहाटी (आसाम) उच्च न्यायालयाने मुसलमान याचिकाकर्त्याला फटकारले. गुवाहाटी (आसाम) येथील विमानतळामध्ये नमाजपठणासाठी स्वतंत्र खोली देण्याची मागणी करणारी याचिका गुवाहाटी उच्च न्यायालयात करण्यात आली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली. राणा सुदैर जमान या व्यक्तीने ही याचिका केली होती. मुख्य न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती सुस्मिता फुकन खौंड यांच्या खंडपीठाने स्वतंत्र प्रार्थना खोली बांधून सार्वजनिक हानी कशी टाळता येईल, याविषयी उपस्थित असलेल्या याचिकाकर्त्याला विचारले. (Gauhati High Court)
(हेही वाचा : Narendra Modi : घराणेशाही पक्ष कुटुंबाच्या कल्याणात गुंग; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका)
राज्यघटनेमध्ये उल्लेख आहे का ?
न्यायालयाने या वेळी जमान याला विचारले की, राज्यघटनेमध्ये ‘सर्व सार्वजनिक ठिकाणी प्रार्थनेसाठी खोली असावी’, अशा प्रकारच्या अधिकाराचा कुठे उल्लेख आहे ? सरकारने काही विमानतळांमध्ये प्रार्थनेसाठी खोल्या बनवल्या आहेत; मात्र याचा अर्थ असा नाही की, सर्वच सार्वजनिक ठिकाणी प्रार्थनेसाठी खोली असली पाहिजे. मग केवळ विमानतळच का ? प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी का नाही ? अशा प्रकारची मागणी करणे, हा मूलभूत अधिकार आहे का ? (Gauhati High Court)
नमाजपठणातून उत्पन्न मिळत नाही !
राणा जमान याने न्यायालयाने म्हटले की, विमानतळामध्ये धूम्रपान, स्पा आणि उपाहारगृह बनवण्याचा नियम आहे; मग नमाजपठणासाठीही एक खोली असली पाहिजे.यावर न्यायालयाने म्हटले की, धूम्रपानासाठी वेगळी खोली यासाठी बनवली जाते; कारण धूम्रपानाचा इतरांना त्रास होऊ नये. उपाहारगृहांतून उत्पन्न मिळते; पण लोक नमाजपठणासाठी गेले, तर त्यातून कोणतेही उत्पन्न मिळणार नाही.याचिकेत पुढे असेही म्हटले होते, ‘बहुतांश विमानांच्या वेळा नमाजाच्या वेळी असतात. त्यामुळे वेगळी खोली असायला हवी.’ यावर न्यायालयाने म्हटले की, प्रत्येक प्रवाशाला विमानाची वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्याला ज्या वेळेमध्ये सुटणारे विमान हवे आहे, ती वेळ तो निवडू शकतो. (Gauhati High Court)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community