जी २० देशांमधील झाडे, फुले, भाज्या पहायच्या असतील, तर भेट द्या भायखळ्यातील उद्यान प्रदर्शनाला

150

कोविड प्रादुर्भावामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा प्रथमच महापालिकेच्यावतीने भायखळा पूर्व परिसरातील वीर माता जिजाबाई भोसले उद्यानाच्या परिसरात उद्यान प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात जी २० देशांतील झाडे, फुले, भाज्यांच्या झाडांचा समावेश आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते पार पडले. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे सामर्थ्य अधोरेखित करणारे प्रदर्शन असेल सांगत आश्विनी भिडे यांनी यामुळे पर्यावरण विषयक जागरूकता वाढविण्यास निश्चितपणे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

bmc 1

यंदा ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान भायखळा पूर्व परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आयोजित हे भव्य प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत म्हणजेच ५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे. या उद्घाटन अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले. उद्यान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उपायुक्त (शिक्षण) केशव उबाळे, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, ‘इ’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजयकुमार यादव, संचालक (प्राणिसंग्रहालय) संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bmc1

या वार्षिक प्रदर्शनासोबतच उद्यान या विषयाशी संबंधित विविध ११ बाबींवरील कार्यशाळांचे आयोजनही प्रदर्शन कालावधी दरम्यान करण्यात आले आहे. तर प्रदर्शनासोबतच उद्यान विषयक वस्तुंच्या विक्रींची ४२ दालने देखील या ठिकाणी उभारण्यात आली आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

bmc3

जी २०चे बोधचिन्ह आणि देशांमधील झाडे,फुले, भाज्यांचा सामावेश

दरवर्षीच्या वार्षिक उद्यान प्रदर्शनामध्ये पाना-फुलांचा वापर करुन वैविध्यपूर्ण रचना सादर करण्यात येतात. या रचनांना देखील मुंबईकर नागरिकांचा आणि विशेष करुन लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. यंदाच्या प्रदर्शनात पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्वीटी आणि सिल्व्हेस्टर यांच्यासह नानाविध ‘कार्टून्स’ च्या रचना पानाफुलांपासून साकारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पाना-फुलांपासून साकारलेले ‘जी २०’ चे बोधचिन्ह आणि ‘जी २०’ सदस्य देशांमधील झाडे – फुले आणि भाज्या यांचा देखील समावेश यंदाच्या उद्यान प्रदर्शनात आहे. यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळत आहेत. तसेच मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ असणा-या कृष्णवडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे देखील यंदाच्या प्रदर्शनात बघता येत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.