काश्मीर खोऱ्यातील हिंदू पंडितांचा १९९०मध्ये झालेला वंशविच्छेद आणि स्त्रियांवर झालेले अमानुष अत्याचार यावर निर्माता विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काढला जो देशभरात गाजला. या चित्रपटाची गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFY 2022 मध्ये निवड झाली, मात्र यासाठी प्रशिक्षकांच्या गटाच्या प्रमुख पदी निवड केलेले इस्त्राईल येथील चित्रपट निर्माते नदव लॅपिड यांनी मात्र हा चित्रपट ‘अश्लील’ आणि ‘अपप्रचार’ करणारा आहे, असे म्हटले. त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. लॅपिड यांच्यावर चौफेर टीका होऊ लागल्यावर आता त्यांना उपरती आली आहे.
वक्तव्याचा सोयीनुसार वापर
‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीवर विशेष चर्चेत सहभाग घेताना नदव लॅपिड यांनी ‘अपप्रचार’ म्हणजे काय, हे कोणीही ठरवू शकत नाही. ही वस्तुस्थिती मला मान्य आहे. हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. हा चित्रपट उत्कृष्ट आहे. मी जे बोललो ते मी जे पाहिले ते सांगणे माझे कर्तव्य आहे’, असे लॅपिड म्हणाले. माझ्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक भावना भडकावल्या जातील, अशा पद्धतीने वापर करण्यात आला. इतर ज्युरी सदस्यही माझ्या विधानाशी सहमत होते, पण ते दबावाखातर बोलू शकले नाहीत, असेही लॅपिड म्हणाले.
(हेही वाचा स्टेट बँकेचा ‘तालिबानी’ निर्णय, विरोधानंतर माघार)
Join Our WhatsApp Community