सोशल मीडियात इंस्टाग्राम, फेसबुक येथे सवंग लोकप्रसिद्धीसाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. त्यातून समाजविघातक संदेश देणारेही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात, तेव्हा त्याचा विपरीत परिणाम हा समाजमानवर होत असतो. असाच एक व्हिडिओ इंस्टग्राम येथे इफ्फि खान याने धावत्या रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या कशी करता येते, असे दाखवणारा व्हिडिओ व्हायरल केला आहे. याची गंभीर दखल रेल्वे घेतली आहे.
आयएफएफव्हाय खान याचा व्हिडिओ आत्महत्येसारख्या समाजघातक प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रेल्वेकडे करण्यात आली आहे. #Railways #Mumbai #Govermmentrajlwaypolice pic.twitter.com/smIfZWSf8u
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) July 24, 2021
काय आहे त्या व्हिडिओमध्ये?
इफ्फि खान हा स्वतःची प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून ओळख सांगतो, तसेच इव्हेंट प्लॅनर म्हणूनही काम करत असल्याचे त्याच्या ओळखीवरून स्पष्ट होते. त्याने वांद्रे-खार दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर हा धक्कादायक व्हिडिओ बनवला आहे. त्यामध्ये तो दूरध्वनीवर बोलताना काहीसा निराश होतो आणि त्याचवेळी समोरून लोकल येते तेव्हा तो निराशेपोटी धावत्या रेल्वे गाडीखाली उडी मारून जीव देतो, असे दाखवले आहे. यावर आता सोशल मीडियातून टीका होऊ लागली आहे.
(हेही वाचा : धक्कादायक! रायगडमध्ये पुन्हा कोसळली दरड!)
रेल्वेने घेतली दखल!
इफ्फि खान याला इंस्टाग्राममध्ये ४४ हजार फॉलोवर्स आहेत. त्यामुळे याच्या या व्हिडिओचा परिणाम समाजमनावर व्यापक स्वरुपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इफ्फि खान याचा हा व्हिडिओ आत्महत्येसारख्या समाजघातक प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी थेट रेल्वेकडे करण्यात आली आहे. त्यावर रेल्वेने याची गंभीरपणे दखल घेतली आहे.
Join Our WhatsApp Community