नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घटात बस आणि दोन ट्रकमध्ये भीषण अपघात (Igatpuri Accident) झाला आहे. या अपघातात बसचालकासह २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोठी जिवितहानी टळली –
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक-मुंबई महामार्गावर (Igatpuri Accident) नवीन कसारा घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. घाटामध्ये अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ओव्हरटेक करून जात असताना पुढे जाणाऱ्या बस व भंगार वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. सुदैवाने या धडकेनंतर बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बस महामार्गालगत असलेल्या नाल्यात वळवली. ज्यामुळे मोठी जिवितहानी टळली.
(हेही वाचा – Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य; मराठा बांधवांकडून जल्लोष)
जखमी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल –
या अपघातात बसमधील ड्रायवरसह दोन जन गंभीर (Igatpuri Accident) जखमी झाले आहेत. जखमींना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. या बसमधून एकूण ४० ते ५० प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांना दुसऱ्या बसने इच्छित स्थळी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातात भंगार घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात पलटी झाल्याने पूर्ण रस्त्यावर भंगार पसरुन येणा- जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला होता.
(हेही वाचा – Manoj Jarange Patil : मराठा आंदोलकांविरोधातील राजकीय गुन्हे मागे – मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश)
अपघाताची (Igatpuri Accident) माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र घोटीच्या कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच रस्त्यावरील ट्रक व पसरलेले भंगार बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community