Igatpuri मध्ये नागरिकांच्या घरात शिरले पाणी! मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

150
Igatpuri मध्ये नागरिकांच्या घरात शिरले पाणी! मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
Igatpuri मध्ये नागरिकांच्या घरात शिरले पाणी! मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

सुरूवातीस मुसळधार पावसानं (Maharashtra Weather) झोडपून काढल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र हा पाऊस संपूर्ण राज्यातच लपंडावाचा खेळ खेळताना दिसला. दरम्यानच्या काळात सूर्यकिरणांनी बहुतांश जिल्हे न्हाऊन निघाले आणि अनेक ठिकाणी तापमानाचा आकडाही वाढला. आता राज्यात पुढील 2-3 दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. (Mumbai Rain) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

2 हजार 62 क्यूसेक वेगाने पाणी
पावसामुळे रात्री त्र्यंबकेश्वर शहरात पाणी शिरल्याचे दिसून आले. त्र्यंबकेश्वर शहरात पावसाचे पाणी आल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने दारणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सकाळी 8 वाजता 520 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तर शुक्रवारी रात्री 9 वाजता दारणा धरणातून 400 क्यूसेकने वाढ करुन एकूण 850 क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते.मात्र पावसाची संततधार कायम असल्याने दारणातून विसर्ग वाढवून 2 हजार 62 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. (Igatpuri)

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित
इगतपुरीत शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे इगतपुरी शहरातील खालच्या पेठ येथील रहिवाशांच्या घरात थेट पावसाचे पाणी घुसल्यामुळे येथील नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहावयास मिळाले. काही ठिकाणी नुकत्याच भाताच्या आवण्या आवरल्या असल्याने या भात पिकांना पाण्याची आवश्यकता होती. पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर या पावसामुळे हवेत गारवा पसरल्याने उकाड्यापासुन हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. (Igatpuri)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.