देशातील प्रतिष्ठित आयआयटी संस्थेच्या धर्तीवर मुंबईत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) उभारण्यात येणार असून, यासाठी केंद्र सरकारकडून ४०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
‘वेव्ह्ज २०२५’ (Waves 2025) शिखर परिषद नवी दिल्लीत पार पडली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी IICT ची संकल्पना सादर करत मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवण्याच्या उद्देशाने हे संस्थान स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. IIT बॉम्बेप्रमाणेच हे केंद्र व्हिज्युअल एफेक्ट्स (VFX), अॅनिमेशन, डिजिटल मीडिया, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरीटेलिंग आणि वेब 3.0 तंत्रज्ञान अशा क्षेत्रांसाठी संशोधन आणि प्रशिक्षण देईल. यासाठी गोरेगाव फिल्मसिटीमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे.
(हेही वाचा – काँग्रेसप्रणित Telangana मध्ये हिंदू सणासाठी ‘तुष्टीकरणाचे फरमान’; होळी साजरी करण्यावर लादली बंधने)
मुंबई – जागतिक क्रिएटिव्ह हब
मुंबई आधीच बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगाचे मोठे केंद्र आहे. IICT मुळे भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला जागतिक स्तरावर ओळख मिळेल. दावोस आर्थिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहे, तसेच मुंबई क्रिएटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जागतिक ब्रँड म्हणून उभे राहील, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नमूद केले.
‘वेव्ह्ज 2025’ शिखर परिषद
‘वेव्ह्ज 2025’ (Waves 2025) ही परिषद ब्रॉडकास्टिंग, चित्रपट, ॲनिमेशन, गेमिंग, डिजिटल मीडिया, संगीत, जाहिरात, सोशल मीडिया आणि नवीन तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी मोठे व्यासपीठ ठरेल. महाराष्ट्राला या परिषदेचे यजमानपद मिळाले असून, ही परिषद 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे.
या परिषदेमुळे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल, नवनवीन कल्पनांना चालना मिळेल आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत संधी उपलब्ध होईल. सध्या भारत 60 हून अधिक OTT प्लॅटफॉर्मसह जागतिक स्तरावर वेगाने विस्तार करत आहे.
IICT च्या स्थापनेमुळे मुंबई जागतिक मनोरंजन तंत्रज्ञानाचे केंद्र बनण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community