IIT Bombay च्या विद्यार्थ्यांकडून श्रीराम-सीता यांचे विडंबन; सीताच्या तोंडी अश्लील संवाद; IIT गंभीर दखल घेणार; पण…

रावणाने अपहरणामुळे सीता लंकेत आनंदी होती, असे दाखवण्यात आले.

696

मुंबईतील IIT Bombay च्या विद्यार्थ्यांचे नाव मोठे लक्षण खोटे अशी स्थिती आहे. या संस्थेचे विद्यार्थी कायम कोणत्या ना कोणत्या वादात अडकत असतात, चुकीच्या गोष्टी करत असतात. आता या विद्यार्थ्यांनी कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थानी असलेल्या रामायणाचा अवमान केला आहे. या विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित नाटक बसवले. 31 मार्च रोजी परफॉर्मन्स आर्टस् च्या कार्यक्रमात हे नाटक दाखवण्यात आले. ज्यामध्ये बिनबोभाटपणे प्रभू श्रीराम आणि सीता यांचे विडंबन केले आहे. यामुळे या संस्थेतील काही विद्यार्थी प्रचंड संतापले आहेत. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

या नाटकात केलेल्या विडंबनप्रकरणी IIT Bombay गंभीर दखल घेणार असून त्यावर कारवाई करण्यात येईल, असे IIT Bombay च्या जनसंपर्कप्रमुख फाल्गुनी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलताना सांगितले. मात्र IIT Bombay च्या अशा कार्यक्रमात नाटक सादर होणारच नाही, त्यासाठी सर्व नाटकाची संहिता आधीच का तपासली जात नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


(हेही वाचा Election Duty टाळणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणारच; निवडणूक आयोग उच्च न्यायालयात काय म्हणाले?)

सीताकडून रावणाची स्तुती 

IIT Bombay च्या सांस्कृतिक महोत्सवात ‘राहोवन’ नावाचे नाटक दाखवण्यात आले. या नाटकात श्रीरामाचे नाव ‘राया’, सीतेचे नाव ‘भूमी’ आणि रावणाचे नाव ‘अघोरा’ असे ठेवण्यात आले. या नाटकात ‘राम आणि सीता एकमेकांला मारत असल्याचे दाखवण्यात आले. रावणाने केलेल्या अपहरणामुळे सीता लंकेत आनंदी असून रावणाची स्तुति करत आहे, रावणाला ती खरा मर्द असल्याचे सांगते. लक्ष्मण आणि सीता एकमेकांशी अश्‍लील संवाद साधत आहेत’, असे दाखवण्यात आले होते. या नाटकात सीता रामाला स्त्री अत्याचारी म्हणते. स्त्रीला कमी लेखनाला असल्याचे सांगत असते.  नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनय करणारे विद्यार्थी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी ‘आयआयटी बाँबे’मधीलच काही हिंदु विद्यार्थ्यांनी केली आहे.  IIT Bombayने या घटनेसंदर्भात अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.