IIT Campus Placement : आयआयटी मुंबईच्या एका तरुणाला १ कोटी रुपयांची नोकरी

आयआयटी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ३८८ कंपन्यांनी सहभाग नोंदवला. 

239
IIT Campus Placement : आयआयटी मुंबईच्या एका तरुणाला १ कोटी रुपयांची नोकरी
IIT Campus Placement : आयआयटी मुंबईच्या एका तरुणाला १ कोटी रुपयांची नोकरी
  • ऋजुता लुकतुके

गेल्यावर्षी मुंबईच नाही तर इतरही आयआयटी संस्थांच्या (IIT Institute) प्लेसमेंटला आलेली मरगळ यंदा आयआयटी संस्थांनी (IIT Institute) झटकून टाकली आहे. आयआयटी मुंबईच्या एका तरुणाला यंदा वार्षिक १ कोटी रुपयांची नोकरी मिळाली आहे. आणि विशेष म्हणजे यंदा १ कोटींचं पॅकेज ओलांडणारी एकूण ८५ मुलं आहेत. (IIT Campus Placement)

तर ६३ मुलांना भारताबाहेरच्या कंपन्यांकडून बोलावणं आलं. यात प्रामुख्याने जपान, तैवान, द कोरिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि हाँगकाँग इथल्या कंपन्या होत्या. कंपन्या टेक्नॉलॉजी सह फायनान्स आणि फिनटेक क्षेत्रातील आहेत. ॲक्सेंचर, ॲपल, एअरबस, एअर इंडिया, बजाज, बारक्लेज्, कोहेसिटी, दा विंची, फुलरटन या कंपन्यांबरोबरच भारतीय सरकारी कंपन्यांनीही यात आघाडीवर होत्या. (IIT Campus Placement)

(हेही वाचा – Recruitment : 1 हजारहून अधिक वनरक्षक पदांची होणार भरती; वनमंत्र्यांचा मोठा निर्णय)

आयआयटीच्या १,१८८ तरुणांना या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकऱ्या मिळाल्या.

यंदापासून आयआयटी संस्थेनं (IIT Institute) विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी वेगळी रणनीती ठरवली आहे. विद्यार्थ्यांना नोकरीचं दडपण येऊ नये यासाठी वर्षातून दर काही महिन्यांनी असे मेळावे आयोजित करण्यात येतात. आणि तरुणांचा आधी कंपनीशी संवाद होईल अशी व्यवस्था केली जाते. त्यामुळे विद्यार्थी आधी ईमेल किंवा व्हर्च्युअल मीटिंगच्या मदतीने कंपनीशी संवाद साधतात. आणि मग मुलाखतीचा कार्यक्रम ठरवला जातो. (IIT Campus Placement)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.