आयआयटी कानपुरचं पाऊल पडते पुढे; निर्माण केलं कृत्रिम ह्रदय!

गेल्या काही वर्षांत ह्रदयविकाराचे प्रमाण वाढू लागले आहे. विशेषतः कोरोना काळानंतर ह्रदयविकारात जलदगतीने वाढ होत आहे. अचानक ह्रदयविकाराचा झटका आला आणि माणूस दगावला अशी प्रकरणे समोर येत आहेत. एकतर आपली जीवनशैली इतकी बदलली आहे की आपण अनेक रोगांना आमंत्रण देत आहोत. त्यात ह्रदविकारावर संशोधन होणे अतिशय महत्वाचे आहे.

आता ह्रदयरोगावर उपचार करण्यासाठी आयआयटी कानपुरच्या वैज्ञानिकांनी आणि ह्रदयरोग विशेषज्ञांनी मिळून कृत्रिम ह्रदयाची निर्मिती केली आहे. याचा वापर ह्रदय प्रत्यारोपणासाठी होऊ शकतो. त्यामुळे ही मोठी कामगिरी मानली जात आहे. केजीएमयू चे संचालक प्रा. अभय करंदीकर यांनी सांगितलं की, २०२३ मध्ये ट्रायल झाल्यानंतर दोन वर्षांत कृत्रिम ह्रदयाचा वापर प्रत्यक्षात केला जाऊ शकेल. यामुळे ह्रदय प्रत्यारोपणात सुलभता येऊ शकते.

( हेही वाचा: सरकारी नोकऱ्यांसाठी नवा नियम लागू! अन्यथा वार्षिक वेतनवाढ रोखणार )

प्राध्यापक अभय करंदीकर यांनी स्पष्ट केलं की, संस्थेच्या १० वैज्ञानिक आणि चिकित्सकांनी मिळून हे कृत्रिम ह्रदय तयार केले आहे. येत्या फेब्रुवारीच्या आधी याचं ट्रायल होणार आहे. सर्व अवयवांना रक्त योग्य पद्धतीने पोहोचवणे हा कृत्रिम ह्रदयाचा उद्देश आहे. जर यात यश प्राप्त झाले तर यामुळे प्रत्यारोपण देखील करता येईल असं प्राध्यापक करंदीकर म्हणाले आहेत. केजीएमयू च्या सेल्बी सभागहात ११८ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी ५२ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि रौप्य पदक देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं. आयआयटी कानपुरच्या या यशामुळे भारतात ह्रदयविकाराच्या बाबतीत क्रांती घडू शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here