आयआयटी मद्रासचे (IIT Madras ) संचालक प्राध्यापक व्ही कामकोटी (V Kamakoti) यांनी गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांची प्रशंसा केली आहे. त्यांनी एका साधूचा ताप गोमूत्रामुळे कमी झाल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि द्रमुक त्यांना पोटशूळ झाले आहे. तर दुसरीकडे . त्यांच्या विधानाचे तामिळनाडू भाजप अध्यक्ष के अण्णामलाई यांनी समर्थन केले आहे.
( हेही वाचा : Cricket in Olympics : ऑलिम्पिक समितीच्या बैठकीसाठी जय शाह लुसानमध्ये दाखल)
चेन्नई येथील एका कार्यक्रमात प्राध्यापक व्ही. कामकोटी (V Kamakoti) यांनी गोमूत्रासंदर्भात महत्त्वपूर्ण भाष्य केले. कामकोटी म्हणाले की, गोमूत्रात बॅक्टेरियाविरोधी, बुरशीविरोधी आणि पचनशक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. पोटाच्या समस्यांवरही गोमूत्र हे एक चांगले औषध आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच कामकोटी यांनी गोमूत्राच्या इतर औषधी गुणधर्मांबद्दलही सांगितले.
प्राध्यापक कामकोटी म्हणाले की, गोमूत्रातील गुणधर्मामुळे ते ताप कमी करते. यावेळी त्यांनी एका साधूचे नाव सांगून संदर्भही दिला. तसेच सेंद्रिय शेतीचे फायदे स्पष्ट करताना प्राध्यापक कामकोटी यांनी गोमूत्राचे हे गुणधर्म सांगितले. ते म्हणाले, “जर आपण खतांवर आपला वेळ वाया घालवला तर आपण पृथ्वी मातेला विसरून जाऊ. आपण जितक्या लवकर सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे वळू तितके आपल्यासाठी ते चांगले होईल.” असे ही कामकोटी म्हणाले. तसेच त्यांनी स्थानिक प्रजातीच्या गाईंना प्रोत्साहन देण्यास सांगितले. त्याचबरोबर अर्थव्यवस्था आणि शेतीमधील त्याचे महत्त्व देखील सांगितले.
प्राध्यापक कामकोटी यांच्या या विधानावर द्रमुक आणि काँग्रेस नेते संतापले. काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी याला छद्मविज्ञान आणि चुकीचे म्हटले. द्रमुकच्या एका नेत्याने याला देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न म्हटले. तामिळनाडूतील इतर पेरियार समर्थक संघटनांनी या विधानाबद्दल प्राध्यापक कामकोटी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. (K. Annamalai)
दरम्यान तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष के अण्णामलाई (K. Annamalai) यांनी प्राध्यापक कामकोटी यांच्या विधानाचे समर्थन केले आहे आणि त्याच्या विधानाचे राजकारण करू नका असे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी फिजिक्समध्ये तज्ज्ञ आहेत आणि ते उच्च सरकारी संस्थांचे सदस्य देखील राहिले आहेत. ते त्याच्या धार्मिक श्रद्धेवर आणि गाईबद्दलच्या आदरावर ठाम आहेत, जे अजिबात चुकीचे नाही.
अण्णामलाई (K. Annamalai) पुढे म्हणाले, “त्यांनी कोणालाही गोमूत्र पिण्यास भाग पाडले नाही. त्यांनी त्यांचा विश्वास व्यक्त केला आहे. कोणीही अशा विधानांचे राजकारण करू नये. आयआयटी-एमचे संचालक तामिळनाडूचे आहेत, ही आपल्या राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी त्यांना ओळखतो आणि मला त्यांच्या विधानाचे राजकारण करायचे नाही.”, असे ही अण्णामलाई यांनी नमूद केले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community