चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना या महामारीने मागच्या दोन वर्षांत थैमान घातले आहे. शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात सतत कोरोनाचे नवे व्हेरिएंट भर घालत असतात. सध्यातरी कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लस हा एकमेव पर्याय आहे. भारतीयांनी कोरोनावर प्रभावी ठरणारी लस तर शोधलीच, पण आता भारतातील दोन संशोधकांनी कोविडविरुद्ध एक रामबाण उपाय शोधला आहे.
पेटंटसाठी केला अर्ज
भारतातील दोन संशोधकांनी कोविडविरुद्ध आयुर्वेदिक पेयाचा शोध लावला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मंडी आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी, नवी दिल्ली येथील संशोधकांनी हे यश मिळवले आहे. हे पेय 98 टक्के कोरोना विषाणूवर प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. धेमाजी जिल्ह्यातील पंकज गोगोई आणि गोलाघाट येथील प्रांजल गम यांनी हिमालयीन प्रदेशात पसरलेल्या भागातील वनस्पतींच्या मिश्रणातून बनवलेल्या पेयाच्या पेटंटसाठी अर्ज दिला आहे.
संशोधनात आढळले परिणाम
संशोधकांच्या मते, हिमालयीन प्रदेशात सापडलेल्या वनस्पतीच्या पानांच्या आण्विक गतिशीलतेचा अभ्यास केल्याने कोरोनाविरूद्ध दोन प्रभावी परिणाम मिळाले आहेत. ही वनस्पती हिमालयीन प्रदेशात आढळते. बुरांश नावाच्या या वनस्पतीला शास्त्रीयदृष्ट्या र्होडेडेन्ड्रॉन आर्बोरियम म्हणतात, स्थानिक लोक आरोग्य उपचारांसाठी या वनस्पतीचा वापर वापरतात. आयआयटी मंडी आणि आयसीजेआयबीच्या शास्त्रज्ञांनी या वनस्पतीवर वैज्ञानिक प्रयोग केले.
( हेही वाचा :शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही सुरु होणार? )
उत्तराखंड राज्य वनस्पती
बुरांश या वनस्पतीला उत्तराखंडच्या राज्य वनस्पतीचा मान आहे. या वनस्पतीची फुले लाल आणि गुलाबी रंगाची असतात. ज्याचा वापर स्थानिक लोक विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आणि औषध म्हणून करतात.
Join Our WhatsApp Community