आर्थिक मंदीतही विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! तब्बल ४ कोटींच्या पॅकेजची ऑफर

164

भारतातील IIT च्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या पॅकेजबाबत आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. IIT मध्ये आता प्लेसमेंटचा कालावधी सुरू झालेला आहे. यामध्ये आयआयटी दिल्ली, मुंबई आणि कानपूरच्या विद्यार्थ्यांना तब्बल ४ कोटींपर्यंत पॅकेज मिळाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षी हा आकडा २.१६ कोटींपर्यंत होता.

( हेही वाचा : खवय्यांसाठी मेजवानी! मुंबईत भव्य ‘मिसळ व बिर्याणी महोत्सव’)

विद्यार्थ्यांना तब्बल ४ कोटी रुपयांचे पॅकेज 

जगभरात सध्या मंदी आणि महागाईचे संकट सुरू आहे. त्यामुळे कित्येक बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरू आहे. असे जरी असले तरीही दिल्ली, मुंबई, मद्रास, रुकडी आणि कानपूर आयआयटीच्या विद्यार्थ्यांना तब्बल ४ कोटी रुपये पगाराच्या नोकऱ्यांची ऑफर देण्यात आली आहे. जेन स्ट्रीटकडून विद्यार्थ्यांना हे पॅकेज देण्यात आले आहे.

प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी आयआयटी गुवाहाटी, रुडकी आणि मद्रासमध्ये एकूण मिळून ९७८ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. काही विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल जॉबसाठी सुद्धा ऑफर मिळाली आहे. आयआयटी रुडकीमध्ये पहिल्याच दिवशी एकूण ६५ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. यात इंटरनॅशनल ऑफर्सचा समावेश आहे. IIT रुडकीमध्ये सर्वाधिक पॅकेज १.३० कोटी आहे. यात जेपी मॉर्गन, मायक्रोसॉफ्ट, टाटा स्टील, उबर, बजाज ऑटो, क्वॉलकॉम, इंटेल टेक्नोलॉजी, मेवरिक डेरिवेटिव्स, इनफर्निया, स्प्रिंकलर, एसएपी लॅब्स अशा बड्या कंपन्यांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.