महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या गोरेगाव- मुलुंड जोड (जीएमएलआर) रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या सहा पदरी उड्डाणपूलांसह मुलुंड खिंडीपाडा येथील चक्रीय उन्नत मार्ग बनवण्यात येत आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी सल्लागार आणि कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आलेली असून यासाठी बनवलेल्या आराखड्याच्या फेरतपासणी आता आयआयटीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यांचे बांधकामाचे आराखडे आणि बांधकाम हे आयआयटीच्या अधिपत्याखाली पाहिले जाणार आहे.
( हेही वाचा : टी-२० वर्ल्डकपसाठी BCCI ने घेतला मोठा निर्णय! बुमराहऐवजी या अनुभवी गोलंदाजाचा संघात समावेश)
गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व उपनगरातील मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडला जाणारा गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या लिंक रोडची एकूण लांबी १२.२ कि.मी असून त्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली भूमिगत बोगद्याची लांबी ४.७ कि.मी एवढी आहे. गोरेगाव फिल्मसिटीमध्ये कट आणि कव्हर भुयारी मार्गाचे पोहोच रस्त्यांसह लांबी १.६० कि.मी एवढी आहे. जीएमएलआर पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या उपनगरांमधी सध्याचे रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरुन वाहतूक कोंडीपासून मोठ्याप्रमाणात मुक्त होण्यास मदत होणार आहे.
जीएमएलआर प्रकल्पांतर्गत फिल्मसिटी रस्त्यावरील रत्नागिरी हॉटेल जंक्शन येथील १.२६ कि.मी लांबीचा उड्डाणपूल आणि खिंडीपाडा तानसा पाईपलाईन येथील त्रिस्तरीय चक्रिय मार्गासह लाल बहादूर शास्त्री रोड जंक्शन ते नाहूर रेल्वे उड्डाणपूलापर्यंतच्या १.८९ कि.मी लांबीचा उड्डाणपूल बनवला जाणार आहे. या दोन्ही कामांसाठी यापूर्वीच एस.पी.सिंगला कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे.
या उड्डाणपूलाचे काम एक स्तंभ आधारीत असून डॉ. हेगडेवार चौक येथे ६० मीटर पुलाची कमान लांगरदोरवर थांबणारे अर्थात केबल स्टे असून मुंबई मेट्रो४ खालीत स्तरावर आहे. मात्र,सिंगला या कंपनीने बांधकामाचा पुलासाठी बनवलेला आराखडा त्रयस्थ संस्थेमार्फत तपासण्यासाठी व्हीजेटीआय आणि आयआयटीकडून अर्ज प्रस्ताव मागवले होते. यामध्ये आयआयटी या संस्थेची नेमणूक करण्यात आली असून या संस्थेला १ कोटी ७२ लाख ८३ हजार एवढी रक्कम आगाऊ स्वरुपात देऊन त्यांची सल्लागार म्हणून नेमणूक केलेली आहे.
Join Our WhatsApp Community