आता IIT शिक्षक घडवणार! ४ वर्षीय बीएड अभ्यासक्रमाची योजना

बीएड (B.Ed) करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आयआयटी (IIT) संस्था ही लवकरच बीए़ड अभ्यासक्रम सुरू करणार आहे. एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) या अंतर्गत IIT मध्ये ४ वर्षांचा बॅचलन इन एज्युकेशन (B.Ed) अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

( हेही वाचा : शिक्षण ते लग्नापर्यंत ‘या’ योजनांचा लाभ घेत असे जमा करा पैसे!)

IIT मध्ये बीएड अभ्यासक्रम

नव्या शैक्षणिक धोरणानुसार याची सुरूवात करण्यात येणार आहे. राज्यातील किंवा देशातील अनेक बीएड महाविद्यालयांची पातळी समाधानकारक नाही असे केंद्रीय मंत्री प्रधान यांनी सांगितले. चांगले शिक्षक भेटले नाहीत तर आपण चांगल्या शिक्षणाची अपेक्षा करू शकत नाही हे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना चांगले शिक्षण देण्याचा सल्ला दिला आहे. म्हणूनच आम्ही या वर्षापासून पायलट प्रकल्प म्हणून आयटीईपी सुरू करीत आहोत असेही प्रधान यांनी स्पष्ट केले. येत्या काही काळात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी IIT ही सर्वोत्तम संस्था असेल, येथून विद्यार्थ्यांना चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. IIT ने भावी शिक्षकांना शिकवले आणि प्रशिक्षण दिले तर विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here