हरित लवादाच्या आरक्षित जागेवर अवैधपणे मदरशाचे बांधकाम

156

घाटकोपर (पश्चिम) येथील सुभाषनगर येथे हरित पट्ट्यातील आरक्षित जागेवर मदरशाचे बांधकाम अवैधपणे चालू आहे. २०२० पासून हे अवैध बांधकाम उघडपणे चालू असून स्थानिक ‘भारत सोसायटी रहिवासी संघा’कडून याविरोधात स्थानिक पोलीस ठाणे आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. मागील २ वर्षांपासून या अवैध बांधकामाच्या विरोधात सातत्याने तक्रार करूनही पोलीस आणि प्रशासन यांनी याकडे अक्षरश: दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम म्हणजे सद्य:स्थितीत ३ मजल्यांपर्यंत हे अवैध बांधकाम वाढवण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल 

‘जमालत अहले मदीस’ या संस्थेकडून या मरदरशाचे बांधकाम चालू आहे. या बांधकामाच्या विरोधात ‘भारत सोसायटी रहिवासी संघा’कडून डिसेंबर २०२० मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इमारत विभाग, स्थानिक पोलीस यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती; मात्र या तक्रारीवर तातडीने कारवाई करण्यात आली नाही. याविषयी पुन्हा नोव्हेंबर २०२२ मध्ये ‘भारत सोसायटी रहिवासी संघा’कडून मुंबई महानगरपालिका, तसेच पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेडून अवैधपणे बांधकाम करणार्‍या ‘जमालत अहले मदीस’ या संस्थेला नोटीस पाठवून अवैध बांधकाम त्वरित हटवण्याचा आदेश दिला आहे. मात्र ‘जमालत अहले मदीस’कडून मुंबई उच्च न्यायालयात कारवाईच्या स्थगितीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाकडून कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

(हेही वाचा समृद्धी महामार्गावर शिंदे-फडणवीस एकाच गाडीत, स्टेअरिंग मात्र शिंदेंच्या हाती)

स्थानिकांकडून तक्रार!

भारत सोसायटी रहिवासी संघाकडून पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये सोसायटीच्या आवारात बांधण्यात आलेल्या अवैध मदरशामध्ये पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत ५ वेळा अजान दिली जाते. या ठिकाणी नमाजपठण करण्यासाठी अनेकदा अज्ञात व्यक्तींचा वावर असतो. याविषयी चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.