Illegal hoarding banner : महापालिका लावलेले होर्डिंग, बॅनर हटवत नाही आणि म्हणते नवीन लावू नका!

484
Illegal hoarding banner : महापालिका लावलेले होर्डिंग, बॅनर हटवत नाही आणि म्हणते नवीन लावू नका!
Illegal hoarding banner : महापालिका लावलेले होर्डिंग, बॅनर हटवत नाही आणि म्हणते नवीन लावू नका!

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुंबई शहर तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरे परिसरातील सार्वजनिक रस्ते तसेच पदपथांवर पूर्व परवानगीशिवाय होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास मुंबई महानगरपालिकेकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी तसेच राजकीय पक्षांनी सार्वजनिक रस्ते, पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे होर्डिंग, बॅनर तसेच पोस्टर लावू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे श्री राम मंदिराच्या अनुषंगाने मागील २२ जानेवारीपासून लावलेले फलक ३१ जानेवारीपर्यंत काढले जावू नये अशाप्रकारचे निर्देशच महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच दिलेले असल्याने आजही अशाप्रकारचे सर्व फलक मुंबईच्या रस्त्यांवर झळकत आहेत त्यांच्यावर कधी कारवाई केली जाणार असा सवाल आता जनतेकडून केला जात आहे. (Illegal hoarding banner)

मुंबई महानगरातील अनधिकृत होर्डिंग, बॅनर तसेच पोस्टर काढण्याची मोहीम मुंबअई महानगरपालिकेच्या परवाना खात्याकडून वेळावेळी राबविण्यात येते, तसेच संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. तरीही नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी तसेच राजकीय पक्षांनी सार्वजनिक रस्ते, पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे होर्डिंग, बॅनर तसेच पोस्टर लावू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अधिकृत जाहिरात फलकांची यादी नागरिकांकरीता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. (Illegal hoarding banner)

(हेही वाचा – Pushkar Jog : विरोधात महापालिकेत वातावरण तापले, कामगार संघटनांनी केली कारवाईची मागणी)

तर संबंधीतांवर गुन्हा दाखल

उच्च न्यायालयामध्ये दाखल जनहित याचिका क्रमांक ३७/२०१० व १५५/२०११ यांच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर लावण्यास मनाई आहे. याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी गठित राज्यस्तरीय समितीची बैठक अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी पार पडली. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक रस्ते तसेच पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही विषयाचे होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास मनाई आहे. अशाप्रकारच्या विना परवानगी होर्डिंग, बॅनर, पोस्टर लावणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरोधात ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा-१९९५’ मधील तरतूदी तसेच ‘मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८’मधील कलम ३२८/३२८-अ, ४७१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. या तरतूदींचा भंग करताना आढळल्यास संबंधीतांवर गुन्हा दाखल करणे तसेच न्यायालयीन दावा दाखल करणे या कायदेशीर कारवाईंचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Illegal hoarding banner)

आधी मुंबई बॅनरमुक्त बनवा, मग आवाहन करा

अयोध्येतील मंदिरात प्रभू श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी समारंभ पूर्वक पार पडली. राम मंदिराचे निर्माण होत असल्याने एकप्रकारची स्वप्नपूर्ती होत असल्याने संपूर्ण मुंबईभर श्री रामाची चित्र असलेले बॅनर प्रदर्शित करण्यात आले आहेत.या बॅनरवर प्रभू श्री रामाच्या छायाचित्रासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचीही छायाचित्रे आहेत. यासह विविध पक्षांच्यावतीने लावलेली बॅनरही असून ही बॅनर तथा बोर्ड अद्याप हटवण्यात आलेले नाही. महापालिका आयुक्तांनी पुढी ३१ जानेवारीपर्यंत हे बॅनर न हटवण्याचे अप्रत्यक्ष निर्देश दिल्याने या फलकांवर कारवाई केली जात नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महापालिका आधीच मुंबईत लावलेले बॅनर व फलक हटवत नाही, आणि दुसरीकडे नवीन लावू नये म्हणून आवाहन करते. यापेक्षा संपूर्ण मुंबई बॅनर व फलकमुक्त बनवा आणि मुंबईकरांना याबाबत आवाहन करा अशी प्रतिक्रिया जनतेकडून ऐकायला मिळत आहे. (Illegal hoarding banner)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.