Ranchi Kali Mandir समोर फेकले गोमांस; स्थानिक हिंदूंचा संताप

स्थानिक हिंदू उतरले रस्त्यावर

153
Ranchi Kali Mandir समोर फेकले गोमांस; स्थानिक हिंदूंचा संताप
Ranchi Kali Mandir समोर फेकले गोमांस; स्थानिक हिंदूंचा संताप

झारखंडची राजधानी रांची येथे काली मंदिरासमोर (Ranchi Kali Mandir ) गोमांसाचे तुकडे फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात अशांततेचे वातावरण पसरले आहे. दि. २९ सप्टेंबर रोजी काली मंदिरासमोर (Ranchi Kali Mandir) आणि रांचीतील एका स्थानकावर मांसाचे तुकडे फेकलेले आढळले. ज्यामुळे लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यात सीसीटिव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, ट्रॅक्टर भरून गोमांस आणले जात होते.

( हेही वाचा : Sexual Assault : वासनांध मुसलमान शिक्षकांकडून विद्यार्थींनीचा विनयभंग; लईक अहमदला आणि साहिल सिद्दीकीला अटक

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ सप्टेंबर रोजी रांचीमधील एचबी रोड येथे सकाळी ११. १५ वाजता गोमांस सापडले. त्यामुळे संतप्त हिंदू (Hindu) रस्त्यावर उतरले. त्यानंतर पोलिस अधिकारी, भाजपचे (bjp) नेते, कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करूनही स्थानिक घटनेविरोधात संतप्त भूमिका घेताना दिसले.

स्थानिक हिंदू (Hindu) नागरिकांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करून शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच धार्मिक भावना दुखावल्याचे सांगितले. दरम्यान मंदिर (Ranchi Kali Mandir) परिसरात मांसाचे तुकडे मिळाल्याने धार्मिक स्थळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.