सरकारी जमिनीवर illegal mosque; तक्रार करणाऱ्या हिंदूना दाऊदच्या नावे धमकी

36
सरकारी जमिनीवर illegal mosque; तक्रार करणाऱ्या हिंदूना दाऊदच्या नावे धमकी
सरकारी जमिनीवर illegal mosque; तक्रार करणाऱ्या हिंदूना दाऊदच्या नावे धमकी

उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर कब्जा करून मशिद (illegal mosque) आणि ईदगाह उभारण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर मशिद तोडण्याची मागणी हिंदू तक्रारदारांनी केली. तेव्हा दाऊद इब्राहिमच्या नावाने हिंदू तक्रारदाराला धमकी देण्यात आली. ही मशिद तमकुहीराजच्या गहडिया चिंतामणी गावांतील रस्त्यालगत उभारण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या मशिदीची उभारणी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीची सरकार असताना झाली होती. याप्रकरणी गावांचे माजी प्रधान इस्लाम अंन्सारी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. प्रशासन प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

( हेही वाचा : Wadala Assembly : सन २००९मधील ‘त्या’ निवडणुकीत पत्ता कापणाऱ्या श्रध्दा जाधव यांचा स्नेहल जाधव काढणार का वचपा

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गडहिया चिंतामणीजवळील गावात पीडब्ल्यूडच्या एक रस्ता आहे. या गावातील रविंद्र शाही यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे की, गावातील रस्त्याच्याकडेला कब्जा करून एक मशिद (illegal mosque) आणि ईदगाह बांधण्यात आली आहे. यामुळे गावकऱ्यांना येण्या- जाण्यास त्रास होतो. तसेच या बेकायदेशीर मशिदीच्या (illegal mosque) निर्मितीत गावाचे प्रधान इस्लाम अन्सारी यांचा समावेश असल्याचा आरोप आहे. शाही यांनी सांगितल्याप्रमाणे सपा सरकारच्या कार्यकाळात ही मशिद बांधण्यात आली. त्या मशिदीवर (illegal mosque) भोंगेही लावण्यात आले आहेत. पुढे पुढे मशिदीने आजूबाजूची जमिनही हडपण्यात आली.

हिंदू संघटनांची हनुमान चालिसा पठणाची घोषणा

मशिद आणि ईदगाहला बेकायदेशीर असल्याचे सांगत हिंदू संघटनेने मोर्च्याचा इशारा दिला आहे. कुशीनगरमधील हिंदू संघटना ‘सनातन सेने’ने हे बेकायदेशीर बांधकाम (illegal mosque) पाडण्याची मागणी केली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहत त्यांनी याबद्दल तक्रारही दिली आहे. संघटनेचे प्रमुख अर्जुन किशोर यांनी सांगितले की, जर लवकरात लवकर प्रशासनाने बेकायदेशीर बांधकाम (illegal mosque) पाडले नाही तर त्याच ठिकाणी हनुमान चालिसेचे पठण केले जाईल. तसेच सनातन सेनेने बेकायदेशीर मशिद (illegal mosque) उभारण्यामागे इस्लाम अन्सारी असल्याचा आरोप केला आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.