illegal number Plate : २८०० वाहनचालकांना दंड, तरीही नंबरप्लेटवर ‘दादा, मामा’!

171
illegal number Plate : २८०० वाहनचालकांना दंड, तरीही नंबरप्लेटवर 'दादा, मामा'!
illegal number Plate : २८०० वाहनचालकांना दंड, तरीही नंबरप्लेटवर 'दादा, मामा'!

अमरावती शहर वाहतूक (Amravti Traffic Police) पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांत सुमारे २८०२ वाहनधारकांना ई-चालानने (E-challan) दंड ठोठावला. तरीही ‘दादा’, ‘मामा’, ‘काका’, ‘भाऊ’ अशा फॅन्सी नंबर प्लेटला लगाम बसलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा वाहतूक पोलिस फॅन्सी नंबर प्लेटबाबत मोहीम हाती घेणार आहेत. शहरातील काही वाहनधारक, विशेषतः राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपल्या मोटारसायकल, कारवर ‘दादा’, ‘मामा’ नंबरप्लेट वापरतात. शहरातील साखळी चोरीच्या घटनांमध्येही बरेचदा दुचाकीवरील नंबर चटकन ओळखू येऊ नये म्हणून कलाकुसर करून नंबर टाकण्यात येत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने यंदा २८०० च्या आसपास वाहनधारकांवर कारवाई करत ५०० पेक्षा अधिक वाहनांच्या फॅन्सी नंबर प्लेट काढून टाकल्या. ‘नो- पार्किंग’मधून (No Parking) उचलून आणलेल्या गाड्यांमध्येदेखील अशी गाडी आढळल्यास त्यावरही कारवाई करण्यात येत आहे. (illegal number Plate)

शहरातील अनेक दुचाकींच्या मागील नंबर प्लेटवर ‘बॉस’, ‘भाई’, ‘दादा’, ‘काका’, ‘मामा’ अशी अक्षरे दिसतात. ही काही नातेवाइकांची नावे नाहीत, तर या आहेत फॅन्सी नंबर प्लेट. फटफट आवाज करत असलेली बुलेट आणि तिच्यावर असलेली अशी नंबरप्लेट हे चित्र तुम्ही अनेकदा पाहिले असेल. सध्या फॅन्सी नंबर प्लेटचे (Fancy number plate) फॅड आले आहे. नंबर प्लेटवर कोणत्याही प्रकारचे सांकेतिक चिन्ह किंवा तत्सम गोष्टी लावणे नियमांच्या विरोधात आहे. त्याला दंडही ठोठावला जातो. मात्र, त्यानंतरही ते फॅड कमी झालेले नाही. (illegal number Plate)

(हेही वाचा –  ‘काँग्रेस ही लूट व फसवणुकीचे पूर्ण पॅकेज’; PM Narendra Modi यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल)

अशी झाली कारवाई

(महिन्यात झालेले केसेस) 

महिना केसेस

जानेवारी २६४

फेब्रुवारी ४२६

मार्च ३९६

एप्रिल २६४

मे ३७०

जून ३५५

जुलै ४११

ऑगस्ट ३१६

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.