ILO Data : उच्चशिक्षित भारतीय तरुण खरंच नोकरीशिवाय राहणार का?

देशात माध्यमिक शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्यांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण १८ टक्के असल्याचं श्रम संघटनेचा अहवाल सांगतो

185
ILO Data : उच्चशिक्षित भारतीय तरुण खरंच नोकरीशिवाय राहणार का?
ILO Data : उच्चशिक्षित भारतीय तरुण खरंच नोकरीशिवाय राहणार का?
  • ऋजुता लुकतुके

लिहिता वाचताही येत नाही, अशा लोकांपेक्षा उच्चशिक्षित भारतीय तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण १९ टक्क्यांनी जास्त आहे, असं धक्कादायक निरीक्षण जागतिक श्रम संघटनेच्या एका अहवालातून समोर आलं आहे. आकडेवारी अशी आहे की, अशिक्षित बेरोजगार तरुणांची टक्केवारी जिथे ३ ते ४ टक्के आहे. तिथेच पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणांचा बेरोजगारी दर २९ टक्क्यांच्या वर आहे. (ILO Data)

ज्यांचं शालेय शिक्षण झालंय त्यांच्यातील बेरोजगारी दर हा १८ टक्के आहे. ‘भारतात बेरोजगारीची समस्या ही प्रामुख्याने तरुणांमधील बेरोजगारीची आहे. त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाहीएत. आणि ही परिस्थिती गेली काही वर्षँ चिघळतेय,’ असं श्रम संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. (ILO Data)

(हेही वाचा – Bharat Ratna : देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न राष्ट्रपतीच्या हस्ते प्रदान)

याचा आणखी एक अर्थ असा होतो की, कौशल्याला वाव मिळेल अशा क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती होत नाहीए. त्याविषयी हा अहवाल सांगतो, ‘भारतीय अर्थव्यवस्थेत मागची काही वर्षं बिगर-शेती क्षेत्रात पुरेशी रोजगार निर्मिती झालेली नाही. तरुणांना शिक्षण मिळतंय. पण, त्या मानाने रोजगाराची संधी उपलब्ध नाही.’ (ILO Data)

चीनमध्येही सध्या तशीच परिस्थिती असून १६ ते २४ वयोगटातील तरुण बेरोजगारांचं प्रमाण १५ ते १६ टक्क्यांवर आलं आहे. विशेष म्हणजे भारतात १५ ते २९ वयोगटाचा विचार करता, बेरोजगार तरुणांचं प्रमाण २०२० च्या ८८ टक्क्यांच्या तुलनेत ८२ टक्क्यांवर आलं आहे. पण, तेच सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण ५४ टक्क्यांवरून ६७ टक्क्यांवर आलं आहे. (ILO Data)

सुशिक्षित महिलांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. आणि पुरुषांमधील ६२ टक्के बेरोजगारीच्या तुलनेत महिलांमधील बेरोजगारी जवळ जवळ ७७ टक्के आहे. (ILO Data)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.