वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस! हवामान खात्याने दिला अलर्ट

127

मुंबई शहर- उपनगरासह नवी मुंबई, ठाणे परिसरात मंगळवार सकाळपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. वाऱ्याचा जोरही जास्त असल्याने पावसाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. यामुळे कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडताना दिसली.

( हेही वाचा : कुलाबा-सीप्झ मेट्रो वर्षाखेरीस धावणार! ‘या’ २६ स्थानकांवर असणार थांबा)

मुंबईसह ठाणे, नवी-मुंबईत पावसाला सुरूवात 

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. बोरिवली, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे या भागात पावसाच्या सरी बरसू लागल्या. ठाण्यासह नवी मुंबईत पहाटे ४ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरूवात होऊन अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. ऐन मार्च महिन्यात पाऊस पडल्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता.

हवामान खात्याचा अलर्ट 

मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात येत्या ३ ते ४ तासात जोरदार पाऊस पडेल असा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. येत्या ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असे ट्विट करत हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.

अवकाळी पाऊस का पडला ? 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठीचे पूरक वातावरण तयार झाले होते. अरबी समुद्रावरून पश्चिमी वारे वाहत असल्याने मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली. पुढील काही दिवस निरभ्र आकाश पहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान या अवकाळी पावसामुळे राज्यात काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये जवळपास २५ जिल्ह्यांना फटका बसला असून अवकाळी पावसामुळे ३९ हजार हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

https://twitter.com/ANI/status/1637998585403912192

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.