अर्धा मार्च महिना सरतोय न सरतोय आणि जसजशी होळी जवळ येऊ लागली आहे, तसा तापमानाचा पारा चढू लागला आहे. गेल्या काही दिवसांत गरमीचे चटके जाणवू लागले असून पारा ४०-४१ वर जात आहे. अशातच पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तापमान ४२ अंशांपार जाण्याचा अंदाज
मार्च महिन्याच्या मध्यातच अंगाची काहिली होत आहे. आता मुंबईसह, पालघर, रायगड, ठाण्यातही तापमान ४२ अंशांपार जाण्याचा अंदाज आहे. सध्या सौराष्ट्र, कच्छ परिसरात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. शिवाय उत्तर कोकणात जमिनीलगत वाहणाऱ्या उष्ण-कोरड्या वाऱ्यांमुळे पुढील ४८ तासांत मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – खुशखबर! १२ ते १४ वयोगटातील मुलांचे ‘या’ तारखेपासून लसीकरण!)
14 व 15 मार्चला मुंबई,ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा.
14 मार्च दक्षिण कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा व 15 मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा.
16 मार्च संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा. काळजी घ्या, IMD ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा pic.twitter.com/OTjauKHffo— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 14, 2022
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सोमवारी सकाळी एक ट्वीट केले आहे. त्यात मुंबईतील उष्णतेच्या लाटेचे स्पष्टीकरण दिले आहे. येत्या दोन दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा ४.५ अंश सेल्सिअसवर आणि कमाल तापमान किमान ३७ अंश सेल्सिअस असावे.
भरपूर पाणी पिण्याचा सल्ला
येत्या दोन दिवसांत मुंबईसह काही शहरांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. अशातच मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. या काळात भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही नागरिकांना दिला जात आहे.
Join Our WhatsApp Community