भारतीय हवामान विभागाद्वारे सद्यस्थितीत विविध ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : IRCTC ई-कॅटरिंग : PNR टाका आणि व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन जेवण मागवा! काय आहे रेल्वेची भन्नाट योजना )
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- तहान लागलेली नसेल तरीही जास्तीत जास्त पाणी प्यावे.
- हलके, पातळ सूती कपडे वापरावेत.
- बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी इत्यादींचा वापर करावा.
- प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचे सेवन करावे.
- घरे थंड ठेवण्यासाठी पडदे व सनशेडचा वापर करावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
काय करू नये
- दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
- गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
- बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
- मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.