हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा! काय काळजी घ्याल?

भारतीय हवामान विभागाद्वारे सद्यस्थितीत विविध ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

( हेही वाचा : IRCTC ई-कॅटरिंग : PNR टाका आणि व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाइन जेवण मागवा! काय आहे रेल्वेची भन्नाट योजना )

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

  • तहान लागलेली नसेल तरीही जास्तीत जास्त पाणी प्यावे.
  • हलके, पातळ सूती कपडे वापरावेत.
  • बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी इत्यादींचा वापर करावा.
  • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचे सेवन करावे.
  • घरे थंड ठेवण्यासाठी पडदे व सनशेडचा वापर करावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

काय करू नये

  • दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
  • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
  • मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here