देशातील ‘या’ भागाचे तापमान ४० अंशावर! पुढचे दोन दिवस उष्णता आणखी वाढणार, काय काळजी घ्याल?

224

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात एवढी उष्णता आहे तर एप्रिल-मे मध्ये काय होईल अशा चर्चा होत आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये उष्णतेची लाट आली असून बहुतांश भागातील कमाल तापमान हे ३७ ते ३९ अंशावर गेले आहे. याच पार्श्वभूमीवर IMD ने पुढचे दोन दिवस अधिक उष्ण असतील असे सांगितले आहे.

( हेही वाचा : ८८ वर्षांच्या वृद्ध महिलेचे मृत्यूपश्चात त्वचादान )

फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मुंबईचे तापमान जवळपास ७.६ अंशांनी वाढले आहे. रविवार १९ फेब्रुवारी ते बुधवार २२ फेब्रुवारी दरम्यान राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशमधील तापमान ४० अंशाच्या जवळपास जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हरियाणा इत्याही भागात ३१ ते ३६ अंशाच्या जवळपास तापमान असेल. तसेच २० आणि २१ फेब्रुवारीला सर्वाधिक तापमान असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये उष्मा अधिक असे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान शनिवारी भुज (सौराष्ट्र आणि कच्छ) येथे सर्वाधिक कमाल तापमान ४०.३ डिग्री सेल्सियस नोंदवले गेले आहे.

उन्हाळ्यात काय काळजी घ्याल?

  • पाण्याची बाटली जवळ ठेवा
  • उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या, मऊ, कॉटनचे कपडे वापरा.
  • आहारात फळे, ताक, लिंबू पाणी, ज्यूस, सरबत, दही याचा समावेश करा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.