देशात उष्णतेची तीव्र लाट येईल, हवामान विभागाने वर्तवली शक्यता! राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ३५ अंशापुढे

यंदाच्या वर्षी संपूर्ण देशात जेवढी थंडी होती त्याहून जास्त तीव्र उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परिणामी यंदा उन्हाळ्यात तापमान उच्चांकावर पोहोचलेले दिसेल. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील ५ दिवसांमध्ये उत्तर पश्चिम आणि मध्य-पूर्व भारतामध्ये कमाल तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ अपेक्षित आहे.

( हेही वाचा : ५१३ कोटींच्या ‘त्या’ प्रकल्पाला वैद्यकीय शिक्षण विभागाकडून स्थगिती )

फेब्रुवारीच्या सुरूवातीला थंडी पडल्यानंतर आता राज्यातील अनेक भागात तापमान वाढले आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये उत्तर मध्य भारतामध्ये हवामानात फारसे बदल अपेक्षित नाहीत. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातील पहिल्या १५ दिवसांमध्ये देशातील बहुतांश भागांमध्ये तापमान ४० अंशांवर किंवा त्याहून जास्त असू शकते.

राज्यातील कमाल तापमान

  • अकोला – ३८.१
  • अमरावती – ३६.८
  • बुलढाणा – ३४.८
  • ब्रह्मपुरी – ३८.२
  • चंद्रपूर – ३५.६
  • गडचिरोली – ३२.८
  • गोंदिया – ३५.८
  • नागपूर – ३५.८
  • वर्धा – ३६.९
  • वाशिम – ३७.२
  • यवतमाळ – ३५.२

उन्हाळ्यात काय काळजी घ्याल?

  • पाण्याची बाटली जवळ ठेवा
  • उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या, मऊ, कॉटनचे कपडे वापरा.
  • आहारात फळे, ताक, लिंबू पाणी, ज्यूस, सरबत, दही याचा समावेश करा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here