भारतीय हवामान विभागाने मंगळवार करता मुंबईत अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिल्यामुळे महापालिकेच्यावतीने मुंबईच्या हद्दीत आणि राज्य शासनाच्यावतीने ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. प्रत्यक्षात मंगळवारी पावसानेही काही हजेरी लावली नाही आणि नाही मुंबईसह इतर भागांमध्ये पाणी तुंबले. पावसा ऐवजी कडक ऊन सोडल्यामुळे नागरिकांकडून पुन्हा एकदा हवामान खाते ट्रोल होत असून हे हवामान खाते आहे की शरद पवार असे विनोदाने म्हटले जात आहे. (IMD)
भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यामुळे मुंबईमध्ये महापालिकेच्यावतीने आपत्कालिन व्यवस्थापनाच्यादृष्टीकोनातून सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेच्यावतीनेही रेड अलर्ट जारी करून नागरिकांना आवश्यक असेल तरच कामानिमित्त घराबाहेर पडा असे आवाहन केले होते. तसेच सर्व माध्यमांच्या शाळा आणि कॉलेजना जाहीर सुट्टी घोषित केली. परंतु प्रत्यक्षात मंगळवारी पाऊस पडलाच नाही आणि त्यावरून हवामान खातेच समाज माध्यमांवर ट्रोल होऊ लागले आहे. हवामान खात्यांचा वारंवार अंदाज चुकला जात असल्याने नागरिकांचा आता हवामान खात्यावरच विश्वास नसून ज्यादिवशी हवामान खाते रेड अलर्ट देते त्यादिवशी नक्कीच पाऊस पडत नाही अशी समजूत आता प्रत्येक जनतेकडून करून घेतली जात आहे. राजकारणात शरद पवारांच्या हा मध्ये ना असतो आणि ना मध्ये हा असतो. त्यामुळे हवामान खाते हे शरद पवारांसारखेच झाल्याची चर्चा जनतेकडून ऐकायला मिळत आहे. (IMD)
हवामान खात्याच्या या चुकलेल्या अंदाजामुळे सोशल मिडियावर विविध विनोद व्हायरल होऊ लागले आहे. यामध्ये वेधशाळा आणि पाऊस म्हणजे विक्रम आणि वेताळ आहे. पाऊस यांच्या मानगुटीवर असतो आणि यांनी अलर्ट दिला की म्हणतो… तू बोला और मैं चला…’, गेले दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता… शेवटी काल संध्याकाळी हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला. शाळा बंद ठेवण्यात आल्या… तेव्हा कुठे आज पाऊस थांबला…’ अशाप्रकारे विविध विनोद सोशल मिडियावरून व्हायरल होऊ लागले आहेत. (IMD)
(हेही वाचा – Wimbledon 2024 : जोकोविचचा उपांत्यपूर्व फेरीत दणक्यात प्रवेश, झ्वेरेवला पराभवाचा धक्का)
रविवारी मध्य रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाची संततधार सोमवारीही कायमच होती. परंतु सोमवारी रात्री आठ वाजता हवामान खात्याच्यावतीने रेड अलर्ट जारी करण्यात आला. रात्री हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आणि त्याच वेळी ढग दाटून आल्याने दिसून आल्याने, सोमवारी दिवसभर ३०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे त्याच मंगळवारी मुसधार पाऊस झाल्यास त्याचा निचरा योग्यप्रकारे होण्यास विलंब होईल परिणामी मुंबईतील काही भाग जलयम होतील या भीतीने महापालिकेने शाळा व कॉलेजची सुट्टी जाहीर केली. परंतु हवामान खात्याने सकाळचा अलर्ट रात्री दिल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हवामान खात्याकडूनच चुकीची माहिती दिल्यामुळे महापालिका आणि राज्य शासनाला सुरक्षात्मक उपाययोजनाच्या दृष्टीकोनातून पाऊले उचलावी लागली. त्यामुळे हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे दिवसभर त्यांना ट्रोल केले जात आहे. (IMD)
हवामान खात्याच्या अंदाजावरच राज्य शासन आणि महापालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थानाची कार्यवाही केली जाते आणि डॉपरल रडावरच संपूर्ण मुंबईच्या परिसरात ढगाचे वातावरण दिसून आल्याने महापालिकेला सुट्टी जाहीर करण्याची वेळ आली. जर पाऊस पडला असता आणि सुट्टी दिली नसती तर यामुळे आपात परिस्थिती निर्माण झाली असती तर महापालिकेचे अधिकारी टार्गेट केले गेले असते. त्यामुळे महापालिकेने कोणती रिस्क न घेता हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. (IMD)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community