भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD monsoon 2024 predictions) यंदाच्या मान्सूनचा पहिलावहिला अंदाज वर्तवत सर्वांनाच मोठा दिलासा दिला आहे. सोमवारी (१५ एप्रिल) IMD ने घेतलेल्या एका पत्रकारपरिषदेदरम्यान यंदाच्या वर्षी देशात ८ जूनपर्यंत मान्सूनचं (IMD monsoon 2024 predictions) आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साधारण ८७ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (IMD monsoon 2024 predictions)
सर्वत्र पाऊसच पाऊस असणार
२०२४ मधील मान्सूनच्या (monsoon) पहिल्या अंदाजानुसार (IMD monsoon 2024 predictions) , यंदा सरासरीहून जास्त पावसाची शक्यता असून, ५ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान सर्वत्र पाऊसच पाऊस असणार आहे. हवामान शास्त्रज्ञ एम. रविचंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार,महाराष्ट्राच्या मान्सून साठी सध्याची परिस्थिती (IMD monsoon 2024 predictions) आशादायी असून, दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल. एकंदर आकडेवारी आणि वाऱ्याची स्थिती पाहता मान्सूनसाठी ही स्थिती पूरक असल्याचं स्पष्ट होत आहे. (IMD monsoon 2024 predictions)
स्कायमेटच्या अंदाजानुसार ,
एकिकडे आयएमडीनं यंदाच्या वर्षी १०६ टक्के मान्सूनची शक्यता वर्तवलेली असतानाच दुसरीकडे स्कायमेटनं (Skymate) काही दिवसांपूर्वीच यंदाच्या वर्षी १०२ टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. या खासगी हवामान संस्थेने जून ते सप्टेंबरच्या काळात यंदाच्या वर्षी साधारण ९५ टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला असून यंदा देशाच्या दक्षिण पश्चिमेसोबत उत्तर पश्चिमेला समाधानकारक पाऊस होईल असं सांगितलं आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये मात्र पाऊस चकवा देईल असा इशाराही स्कायमेटने दिला आहे. (IMD monsoon 2024 predictions)
हे पहा –
Join Our WhatsApp Community