राज्यावर अस्मानी संकट! १५ ते १७ मार्च दरम्यान ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

राज्यातील तापमानात सध्या मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. मोसमी वाऱ्यामुळे येत्या १५ ते १७ मार्च दरम्यान पश्चिम विदर्भातील काही ठिकाणी ढगाळ वातवरण राहणार आहे. यावेळी मध्यम स्वरूपाचा पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात परिचारिका संघटनेचाही सहभाग; रुग्णालयीन सेवेवर होणार परिणाम)

सध्या गहू, हरभरा, कांदा हे पीक कापणीला आले आहे. अशातच या वादळी वाऱ्याचा फटका या पिकांना बसू नये याकरता हवामान विभागाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देत काही सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यात १५ ते १७ दरम्यान विजांच्या कडकडाटासह हलका-मध्यम पाऊस पडेल तसेच राज्याच्या काही भागात गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

१५ मार्चला ‘या’ जिल्ह्यांना पावसासाठी यलो अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, बीड, परभणी, जालना , नांदेड, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, हिंगोली.

१६ मार्चला ‘या’ जिल्ह्यांना पावसासाठी यलो अलर्ट

पालघर, पुणे, सांगली, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

१७ मार्चला ‘या’ जिल्ह्यांना पावसासाठी यलो अलर्ट

पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here