महाराष्ट्राला अवकाळी पावसानं (IMD Rain Alert) झोडपून काढलं आहे. अवकाळी पाऊस (Unseasonal rain) सुरूच आहे. दरम्यान आजही राज्यात हवामान विभागाकडून (IMD) पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे. उन्हाळ्यातील काही दिवस सोडले तर, संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा मारा सुरु आहे. अशातच, हवामान विभागाने शनिवारी आणि रविवारी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. (IMD Rain Alert)
(हेही वाचा –तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार; CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल)
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज (१८ मे) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबत काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात ताशी ४० ते ५० च्या वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (IMD Rain Alert)
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट ?
पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, जळगांव जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (IMD Rain Alert)
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट ?
सोलापूर, सांगली, जालना, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस होऊन गारपीट देखील होऊ शकते. या पार्श्वभुमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (IMD Rain Alert)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community