कोकणासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा! कमी दाबाचा पट्टा सक्रिय

90

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या ४८ तासांमध्ये कोकणाला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यास कोकणातील आंबा फळ बागायतदारांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

( हेही वाचा : छत्तीसगडमध्ये ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप!)

पावसाची शक्यता 

कमी दाबाचा पट्टा पुढचे काही दिवस सक्रिय असल्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वातावरणात मोठा बदल झाला आहे. दरम्यान काही जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा दिल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1638780510846726144

राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत असल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान कोकणातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.