वेधशाळेने सरासरी कोसळणाऱ्या पावसाचे बदलले प्रमाण 

86

यंदाच्या पावसाळ्यात पावसाच्या आगमनाबाबत वरुणराजा नाराज आहे का, अशी शंका येऊ लागली आहे. म्हणून गेल्या ४९ वर्षांच्या पावसाच्या कामगिरीचा अभ्यास करत संपूर्ण देशभरात पावसाळयात प्रत्येक महिन्यात पडणाऱ्या सरासरी पावसाच्या आकडेवारी आता वेधशाळेने बदल केला आहे. या आधारावर जून महिन्यात गेल्या वर्षांपर्यंत अपेक्षित पडणारा पाऊस वेगवेगळ्या ठिकाणी कमी किंवा जास्त पडतो. पावसाचे बदलते पॅटर्न किंवा वातावरणीय बदल या घटकांमुळे दर महिन्यातील अपेक्षित पावसाच्या कामगिरीत हा बदल करण्यात आल्याची माहिती वेधशाळा अधिका-यांनी दिली.

४०० वेधशाळांतील माहिती आता अद्ययावत होणार 

प्रत्येक महिन्यातील अपेक्षित पावसाळा व तापमान या घटकांत दर दहा वर्षांनी बदल केला जातो. देशभरातील सुमारे ४०० वेधशाळांतील नियंत्रित स्थानकांची माहिती आता अद्ययावत केली जात आहे. प्रामुख्याने मोठ्या शहरांतील माहिती अद्यायावत करण्याचे काम सुरु असून मुंबईतील बदल झाले आहेत. मोठ्या शहरांतील माहिती अद्ययावत करणे हा पहिला प्रमुख टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. दुस-या टप्प्यातील काम वेगाने सुरु असून येत्या दोन महिन्यात देशभरातील प्रमुख स्थानकांतील दर महिन्याची पावसाची आणि तापमानाची तसेच इतर आवश्यक घटकांची माहिती अद्ययावत केली जाईल. जून महिन्यात यंदाच्या वर्षापासून झालेल्या बदलानुसार, सांताक्रूझ येथे ५३७.१ तर कुलाब्यात ५४२.३ मिमी पाऊस अपेक्षित आहे. जून महिन्यातील मागील वर्षांतील सरासरीनुसार सांताक्रूझमध्ये ५२४.७ तर कुलाब्यात ५५३.७ मिमी पाऊस अपेक्षित होता. सध्याच्या बदलानुसार आता सांताक्रूझमध्ये जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे, तर कुलाब्यात पूर्वीच्या सरासरीपेक्षाही कमी पावसाची शक्यता नोंदवली आहे. गुरुवार सायंकाळपासून पूर्वमोसमी पावसाचा मारा सुरु झाला. तीन दिवसांत सांताक्रूझ येथे ७९.८ मिमी तर कुलाब्यात १००.२ मिमी पाऊस झाला आहे.

(हेही वाचा ‘सुपरमून’चे मंगळवारी रात्री होणार दर्शन!)

३० वर्षांच्या पावसाचा अभ्यास केला जातो

देशभरातील प्रत्येक महिन्यागणिक सरासरी पावसाची कामगिरी बदलण्यासाठी १९७१ ते २०२० पर्यंतच्या पावसाच्या पॅटर्नचा वेधशाळेने अभ्यास केला. ही पद्धती जागतिक हवामान खात्याच्या निकषांनुसार बदलली गेली. प्रत्येक महिन्यातील पावसाच्या सरासरीत चढ-उतार दर्शवणारे बदल करण्यासाठी किमान ३० वर्षांच्या पावसाचा अभ्यास केला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.