मोबाईल फोनचा गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! IMEI नंबरची करावी लागणार नोंदणी

142

टेलिकॉम विभाग येत्या वर्षात नवे नियम लागू करण्याच्या शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलची IMEI नोंदणी करावी लागणार आहे. १ जानेवारी २०२३ पासून देशात विकल्या जाणाऱ्या सर्व मोबाईल फोनसाठी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर (IMEI Number) ची नोंदणी अनिवार्य असेल. सरकारने या संदर्भात २६ सप्टेंबरला अधिसूचना जारी केली आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व मोबाईल हॅंडसेटचे IMEI क्रमांक पोर्टलवर नोंदणीकृत करणे या अधिसूचनेनुसार आवश्यक आहे.

( हेही वाचा : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला)

IMEI नोंदणी कुठे करायची ?

१ जानेवारीपासून भारतात आयात आणि उत्पादित केलेल्या सर्व मोबाईल फोनचा IMEI क्रमांक दूरसंचार विभागाच्या पोर्टलवर नोंद करणे बंधनकारक असणार आहे. यानंतर ग्राहकांना त्यांचे प्रमाणपत्र मिळेल.

IMEI म्हणजे नेमके काय ?

प्रत्येक मोबाईलची ओळख पटण्यासाठी फोनला कंपनी एक IMEI नंबर देते. हा क्रमांक १५ अंकी असतो. हा क्रमांक मोबाईलची ओळख म्हणून वापरला जातो. IMEI क्रमांकाचा वापर करून तुम्ही मोबाईलच्या लोकेशनचा सुद्धा शोध घेऊ शकता. प्रत्येकाच्या मोबाईचा IMEI नंबर वेगळा असतो. परंतु सध्या बाजारात बनावट फोन सुद्धा उपलब्ध असतात अशावेळी हॅक केल्याच्या घटना घडल्यास बनावट IMEI क्रमांकामुळे गुन्हेगाराचा शोध घेणे अवघड होते म्हणून टेलिकॉम विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मोबाईल संबंधित सर्व गुन्ह्यांना या नियमांमुळे आळा बसेल. IMEI क्रमांकाची नोंदणी केल्यामुळे हरवलेला फोन शोधणे किंवा चोरीला गेलेले फोन ब्लॉक करण्यास सुद्धा मदत होईल. सध्या अनेक घटनांमध्ये फोनचा गैरवापर होत आहेत त्यामुळे केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.