- ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतासाठीचा आर्थिक वर्ष २०२५ साठीचा अंदाज आधीच्या ६.८ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणला आहे. १६ जुलैला ही नवीन आकडेवारी जाहीर झाली आहे. ‘गेल्यावर्षातील आकडेवारी आणि ग्रामीण भागातील विक्रय शक्ती वाढल्यामुळे भारताचा अंदाजे विकासदर हा २० अंशांनी वाढला आहे,’ असं वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुकमध्ये म्हटलं आहे. मागच्याच महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेनंही विकासदरात सुधारणा करून तो ७ टक्क्यांवरून ७.२ टक्क्यांवर आणला होता. (IMF India Growth Forecast)
मागची तीन वर्ष भारताचा विकास दर हा सातत्याने ७ टक्क्यांपेक्षा जास्त राहिला आहे. तर २०२४ मध्ये देशाची अर्थव्यवस्था ८.२ टक्क्यांनी वाढली होती. पण, तो परिणाम हा आधीच्या वर्षी कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेनं साधला होता. त्यानंतर देशाचा विकासदर हा ७ टक्क्यांवर आहे. आता आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ग्रामीण भागही अर्थव्यवस्थेत आधीपेक्षा जास्त सक्रिय होईल, ही जमेची बाजू आहे. (IMF India Growth Forecast)
IMF revises its growth projections 4 India!
India is poised to lead the global economy with a 7% GDP growth forecast forFY25,driven by robust rural consumption.#ModiHaiThoMumkinHai
@BJP4India @PMOIndia @mygovindia @PemaKhanduBJP #IndiaRising #EconomicGrowth #IMFProjections pic.twitter.com/fTKlHjEJuu— Ritemso ManyuBJP 🇮🇳(मोदी का परिवार) (@manyu_ritemso) July 16, 2024
(हेही वाचा – Sumit Nagal : सुमित नागल जागतिक क्रमवारीत ६८ व्या स्थानावर पोहोचला)
ही आहे सध्याची सगळ्यात मोठी समस्या
सध्या देशासमोरचं महत्त्वाचं आव्हान महागाई दर आटोक्यात राखणं हा आहे. जून महिन्यात पुन्हा एकदा किरकोळ महागाई दर ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्न पदार्थांमधील महागाई हे यामागील महत्त्वाचं कारण आहे. आताही अन्न धान्याच्या किमती एप्रिल ते जून तिमाहीत ९.४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. (IMF India Growth Forecast)
भारताची ही अवस्था आहे. तर जागतिक स्तरावर जगाचा आर्थिक विकासदर हा ३.३ टक्के इतका असेल असा नाणेनिधीचा अंदाज आहे. अमेरिका आणि जपानचा विकास दर घटू शकतो, तर चीनचा वाढू शकतो, असाही अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. जगभरात महागाई हीच सध्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. (IMF India Growth Forecast)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community