परभणीत दरोडा टाकून महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करा; उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचे निर्देश

88

परभणी येथे दिनांक ३ जानेवारी च्या पहाटे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. तेथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील एका शेतमजूर महिलेवर सामूहिक अत्याचार केला. यावेळी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. याची विधानपरिषद उपसभापती Dr. Neelam Gorhe यांनी गंभीर दखल घेतली आहे. यात त्यांनी रविवारी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व या घटनेत आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा केली जाईल याबाबत सूचना केल्या. यात परभणीत अशाच प्रकारे गुन्हा घडल्याचे व यातील कार्यपद्धती एकच असल्याचे देखील डॉ. गोऱ्हे यांनी परदेशी यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

(हेही वाचा जो बायडेन यांच्याकडून George Soros यांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार; एलन मस्क म्हणाले, हे विडंबन…)

यात सूचना करताना Dr. Neelam Gorhe यांनी सांगितले की, या प्रकरणी साक्षीदार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत पीडित कुटुंबाला संरक्षण दिले जावे, पीडित कुटुंबाला सामाजिक दृष्टिकोनातून त्रास होत असेल तर त्यांना निकाल लागेपर्यंत दुसऱ्या ठिकाणी निवासाची व उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी. ⁠आरोपीला तत्काळ अटक करावी. पीडित महिला व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात यावे, पीडित महिलेला कौटुंबिक त्रास होणार नाही यासाठी खास लक्ष देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. ⁠मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव तत्काळ तयार करून संबंधित अधिकाऱ्यांना सादर करावा व त्याला तत्काळ मान्यता कशी मिळेल यासाठी पाठपुरावा करावा. ⁠या घटनेत विशेष सरकार वकील नेमत असताना पूर्वी ज्या वकिलांनी दोषसिद्धी मिळाली आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे. ⁠महिलेची वैद्यकीय तपासणी देखील करून घेण्यात यावी अशी सूचना  Dr. Neelam Gorhe  यांनी यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांना केल्या यास परदेशी यांनी स्वीकार केला असून तत्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.