पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जनासाठी मुंबईत यंदा १९१ ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी मागील वर्षाच्या १६२ तुलनेत १९१ अर्थात २९ तलावांची संख्या वाढवण्यात आल्या नंतरही या तलावातील मूर्ती विसर्जनाकडे अपेक्षित कल दिसून आला नाही. या सर्व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पाचव्या आणि गौरी गणपतीच्या ३२ हजार ५०९ मूर्तींचे विसर्जन पार पडले.
शनिवारी रात्री मुंबईत उशिरापर्यंत झालेल्या ८१,५७० गणेश मूर्तीच्या तुलनेत महापालिकेच्या १९१ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी ३२,५०९ मूर्तींचे विसर्जन पार पडले. त्यात ५८१ सार्वजनिक, २९,६२० गणेश मूर्तींसह २,३०८ गौरींचा समावेश होता. तर मागील वर्षी म्हणजे सन २०२२ मध्ये पाचव्या आणि गौरी गणपतीच्या एकूण ३० हजार ४० गणेश मूर्ती व गौरींचे विसर्जन पार पडले होते. विशेष म्हणजे कोविडमध्ये कृत्रिम तलावांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद लाभ होता. कोविडपूर्वी म्हणजे सन २०१९ मध्ये पाचव्या व सहाव्या दिवसांमध्ये केवळ १३ हजार २६८ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. पण कोविडमध्ये कृत्रिम तलावासह फिरते कृत्रिम तलावांची व्यवस्था अधिक उपलब्ध करून देण्यात आल्याने सन २०२० व सन २०२१ मध्ये या दोन्ही दिवशी अनुक्रमे २९ हजार आणि ३४ हजार एवढ्याच गणेश मूर्तींसह गौरींचे विसर्जन झाले होते.
मागील वर्षी १६२ कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली होती, त्या पाचव्या आणि सहाव्या दिवसाच्या ३०,०४० सार्वजनिक आणि घरगुती सह गौरींचे विसर्जन पार पडले होते. आणि २०२१ मध्ये १७३ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती, त्यात पाचव्या आणि सहाव्या दिवसाच्या एकूण ३४,२९९ गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन पार पडले होते. त्यामुळे मागील वर्षी १६२ कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिल्यानंतर या दिवशी ३० हजार ४० मूर्तींचे विसर्जन होते तर १९१ कृत्रिम तलावांची निर्मिती केल्यानंतर या दिवशी दिवस भरातील एकूण मूर्ती विसर्जनाच्या तुलनेत ५० ते ६० टक्के एवढ्या मूर्तीचे विसर्जन होईल अशी अपेक्षा होती, परंतु हे प्रमाण दिवस भरात झाकेल्या एकूण मूर्तीच्या तुलनेत हे प्रमाण ४० टक्के एवढेच आहे.
जर ही आकडेवारी संख्येत पाहिल्यास मागील वर्षीच्या तुलनेत २,६७९ गणेश मूर्तींचे व गौरींचे विसर्जन पार पडले. त्यामुळे नव्याने वाढलेल्या तथा वाढ झालेल्या २९ तलावामध्ये सरासरी ९० ते ९२ मुर्तींचे विसर्जन शनिवारी पार पडले हे स्पष्ट होते. समुद्र किनारी तसेच मोठ्या तलावाच्या दिशेने जाणाऱ्या गणेश भक्तांना कृत्रिम तलावांच्या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी तसेच मुख्य रस्त्यापासून कृत्रिम तलावाच्या जवळपास स्वयंसेवक तैनात करून आवाहन तसेच मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात महापालिका प्रशासन कमी पडत असल्याने कृत्रिम तलावाच्या ठिकाणी बाप्पाचे विसर्जन करण्याकडे भाविकांचा कल दिसून येत नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा – Gauri – Ganapati : यंदा पाच दिवसांसह मुंबईत गौरी गणपतीत दोन हजारने वाढ)
कृत्रिम तलावांमधील पाचव्या आणि गौरीच्या दिवशी झालेल्या मूर्ती विसर्जनाची पाच वर्षातील आकडेवारी…
सन २०२३ मधील एकूण गणेश विसर्जन:३२,५०९
सन २०२२ मधील गणेश मूर्तींचे विसर्जन :३०,०४०
सन २०२१ मधील गणेश मूर्तींचे विसर्जन : ३४,२९९
सन २०२० मधील गणेश मूर्तींचे विसर्जन : २९,९९९
सन २०१९ मधील गणेश मूर्तींचे विसर्जन : १३,२६८
हेही पहा –
Join Our WhatsApp Community