पुण्यात तब्बल २७ तासांपासून गणपती विसर्जन मिरवणुका सुरूच

पुण्यात गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीही गणेश भक्तांचा उत्साह पाहायला मिळत आहे. मानाच्या पाचही गणपतीचे अनंत चतुर्दशीला रात्रीपर्यंत विसर्जन झाले असून शनिवारी दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर आता इतर मंडळांची विसर्जन मिरवणूक चालू असून काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे. दुपारी ३ वाजून १५ मिनिटापर्यंत अलका टॉकीज चौकातून २०६ गणेश मंडळे पुढे सरकली आहेत. पुण्यात अजूनही विसर्जन मिरवणूक सुरूच आहे. पुण्यात गेल्या २७ तासांपासून विसर्जन मिरवणूक सुरू असून अजूनही अनेक मंडळे अलका टॉकीज चौकात येणं बाकी आहे.

( हेही वाचा : प्रभादेवीत बेस्ट सबस्टेशनला आग; अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल )

२७ तासांपासून विसर्जन मिरवणुका सुरूच

संथ गतीने सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीचा वेग वाढण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. टिळक चौकात येणाऱ्या मंडळांना फार वेळ थांबू दिले जात नसल्याने मिरवणुकीने वेग धरला आहे. मात्र, लक्ष्मी रस्ता आणि केळकर रस्त्यावर अद्याप रांगा आहेत. मिरवणूक लवकर संपविण्याच्या दृष्टीने आतापर्यंत पोलिसांनी प्रयत्न केले नसल्याने संथ गतीने मिरवणूक सुरू आहे. मात्र, आता पोलिसांनी हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्ता आणि कुमठेकर रस्त्याने येणाऱ्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीने वेग धरला आहे. या विसर्जन मिरवणुका शनिवारी सायंकाळपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here