जानेवारी महिना संपत आला तरी अवकाळी पावसाचा जोर कमी झालेला नाही. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या २३ व २४ जानेवारीला कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तज्ज्ञांंच्या मते, ला निना परिस्थिती निर्माण झाल्यानेच हवामान बदलले आहे. तसेच कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असून हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर ला निना ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याचा हा परिणाम आहे. गेल्या वर्षी १५ मे रोजी तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्यानंतर मोसमी हंगामातही अतिमुसळधार पाऊस झाला होता. परतीचा पाऊसही ऑक्टोबरपर्यंत होता. पुढे नोव्हेंबर, डिसेंबर आणि नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही अवकाळीची नोंद झाली होती. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला होता. याचाच परिणाम कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, बदलते हवामान, अवकाळी, गारपीटीचा फटका आदींमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
( हेही वाचा : ‘हे’ 15 दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यासाठी मुभा… )
या भागात पावसाचा इशारा
येत्या २३ व २४ जानेवारीला नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रत्नागिरी, अहमदनगर, जळगाव या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
( हेही वाचा : 5 वर्षांखालील मुलांना मास्कची सक्ती आहे का? काय आहे केंद्राची नियमावली? )
ला निना परिस्थिती म्हणजे काय?
पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा महासागर आहे. तेथील वारे आणि प्रवाहांचा जगावर थेट परिणाम होताना दिसतो. त्यात दक्षिण गोलार्धात भूभाग कमी असल्याने प्रशांत महासागराच्या दक्षिण भागातील तापमान जगाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. यालाच सदर्न ऑसिलेशन असे म्हणतात. ला निनाच्या प्रभावामुळे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होते. त्याचा परिणाम फक्त या भागातच नाही तर शेजारी असलेल्या हिंदी महासागरातील सागरी प्रवाहावर आणि वाऱ्यांवर म्हणजे मान्सूनवर होतो. पर्यायाने ला-निनाच्या काळात भारतात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. ला-निनाच्या प्रभावामुळे एकूणच उत्तर गोलार्धात तापमानही कमी होते.
Join Our WhatsApp Community21/01: वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली पुढील 2 दिवसांत उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ आकाश ☁व हलका पाऊस🌧 अपेक्षित आहे.
येत्या २ दिवसांनंतर, राज्यात किमान तापमानात 2-4°C ने हळूहळू घसरण अपेक्षित.
– IMD pic.twitter.com/3tvtOpvEE7— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 21, 2022