PM Awas Yojana Urban 2.0 : शहरी गरीबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ची अंमलबजावणी सुरू

86
PM Awas Yojana Urban 2.0 : शहरी गरीबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ची अंमलबजावणी सुरू
  • प्रतिनिधी

शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 च्या अंमलबजावणीला गती देण्यात आली आहे. बीकेसी येथे या योजनेसंदर्भात कोकण विभागीय कार्यशाळा पार पडली. उपसचिव तथा अभियान संचालक अजित कवडे यांनी तांत्रिक तज्ज्ञांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारून लाभार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. (PM Awas Yojana Urban 2.0)

गृहनिर्माणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारने योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. 14 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने योजनेला मंजुरी दिली. या टप्प्यात EWS गटासाठी ३० ते ४५ चौ. मी. क्षेत्रफळाची घरे बांधण्यात येणार असून, त्यात शौचालय आणि नागरी सुविधांचा समावेश असेल. (PM Awas Yojana Urban 2.0)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकापूर्वी भारताने केले सराव सामने रद्द; थेट बांगलादेशविरुद्ध खेळणार)

राज्यातील योजनेची स्थिती
  • राज्यातील 399 शहरांमध्ये योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.
  • 14.70 लाख घरकुलांना मंजुरी मिळाली असून, 3.79 लाख घरे पूर्ण झाली आहेत.
  • आतापर्यंत 43,989 कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

ही योजना चार प्रमुख घटकांतून राबवली जाणार आहे :

  1. BLC : वैयक्तिक घरकुल बांधकाम
  2. AHP : भागीदारी तत्वावर परवडणारी घरे
  3. ARH : भाडे तत्वावर परवडणारी घरे
  4. ISS : व्याज अनुदान योजना

(हेही वाचा – मिर्झापूरसह ५४ गावांची नावे बदलणार; मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री Mohan Yadav यांची घोषणा)

याशिवाय, घरांसोबत वीज, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, सौरऊर्जा प्रणाली आणि हरित क्षेत्राचा समावेश असणार आहे. MHADA व DMA यांच्या समन्वयाने ही योजना राबवली जात आहे. (PM Awas Yojana Urban 2.0)

हजारो गरजूंसाठी संधी

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 मुळे राज्यातील हजारो गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळणार असून, ही योजना त्यांचे गृहसप्न साकार करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. (PM Awas Yojana Urban 2.0)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.