एस. टी. महामंडळाच्या (ST Corporation) उत्पन्न वाढीसाठी महामंडळाकडून विविध उपक्रमांसह योजनांचीही अंमलबजावणी केली जाते. याअंतर्गत महामंडळाकडून चालक, वाहकांसाठी उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना राबविण्यात येत आहे. एखाद्या मार्गावर उत्पन्नाचे उद्दिष्ट दहा हजार रुपये दिले असेल आणि चालक-वाहकांनी बारा हजार रुपये आणले असतील तर उद्दिष्टापेक्षा दोन हजार रुपये जास्त आले.
(हेही वाचा – Farmer : केंद्राकडून शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट; खताच्या किमती नियंत्रणात आणणार)
अशावेळी चालक वाहकांना २० टक्के म्हणजे चारशे रुपये प्रोत्साहन भत्ता मिळेल. दरम्यान, एस. टी. महामंडळाकडून (ST Corporation) या संदर्भात २६ डिसेंबरला सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून आवश्यक सूचना दिल्या आहेत. १ ते ३१ जानेवारी या कालावधीत या योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक आगाराचे लेखाकार आणि सहायक वाहतूक अधीक्षकांकडून आर्थिक ताळेबंद तपासला जाईल. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जेवढे अधिक उत्पन्न मिळाले, त्याच्या २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून चालक-वाहकांना (प्रत्येकी १० टक्के) विभागून दिली जाईल.
(हेही वाचा – Mumbai Pune Expressway वर वाहनचालकांची कोंडी; अपघातही आणि दंडही)
विविध आव्हाने पार करत सेवा-उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता ही योजना एका महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे. महामंडळाने प्रोत्साहन भत्ता योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, विशेष परिश्रम घेऊन चालक, वाहकाने एसटीच्या उत्पन्नात भर टाकल्यास त्यांनाही या योजनेतून लाभ होणार आहे. (ST Corporation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community