Importance of Value Education : मूल्य शिक्षणाचे महत्व काय आहेत? ‘या’ ७ गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात

1808
शिक्षणासोबत आपल्याकडे संस्कारांनादेखील महत्व प्राप्त झाले आहे. केवळ शिक्षण घेऊन उपयोग नाही. त्यासोबतच मूल्य शिक्षणाचीदेखील (Importance of Value Education) गरज असते. मूल्य शिक्षणाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे आपल्या नैतिक मूल्ये विकसित होतात. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन लाभते, जेणेकरून त्यांच्या गुणांचाही विकास होतो. चला तर जाणून घेऊया मूल्य शिक्षणाचे महत्व (Importance of Value Education) आणि लाभ.
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ लॉरेन्स कोहलबर्ग यांचं असं म्हणणं होतं की “जिथे मुले दैनंदिन संघर्षाबद्दल उघडपणे आणि सार्वजनिक व्यासपीठावर चर्चा करु शकतील, अशा वातावरणात त्यांना वाढवले पाहिजे.” मूल्यशिक्षणाची (Importance of Value Education) परिभाषा काही विद्वानांनी केली आहे. जाणून घेऊया विद्वान काय म्हणतात?
बर्टोन यांच्या मते (१९६१)  – “नैतिक विकास ही एक संयुक्त प्रक्रिया आहे, वेगळी प्रक्रिया नाही.”
गुरुराजा यांच्या संशोधनात असे आढळून आले आहे (१९७८) – “नैतिक मूल्यांचे ज्ञान हेतूच्या पूर्णतेवर प्रभाव टाकते.”

मूल्य शिक्षणाचे फायदे काय आहेत?

आयुष्यात विकास घडवून आणायचा असेल आणि यशस्वी व्हायचे असेल तर आपले चरित्र विकसित झाले पाहिजे. मूल्य शिक्षणामुळे आपण चरित्र निखळते. मूल्य शिक्षणामुळे (Importance of Value Education) तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला आकार दिला जातो.
आयुष्य एक संघर्ष आहे. सुख-दुःख अशा सर्व गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळे नकारात्मक प्रसंगात जर आपल्या मनाचं खच्चिकरण झालं तर पुन्हा आपण उभे राहू शकणार नाही. मूल्यशिक्षाणामुळे आपण संघर्षाचा स्वीकार करतो आणि आशावादी होतो.
स्पर्धात्मक युगात जगायचे असेल तर तुम्हाला स्पर्धेसाठी योग्य व्हावे लागेल. याचा अर्थ स्पर्धांमध्ये अतिरिक्त चढाओढ करावी असा होत नाही. मात्र हे स्पर्धात्मक युग आहे आणी या युगाचा आपल्याला स्वीकार करावा लागणार आहे. मूल्य शिक्षण (Importance of Value Education) घेतलेल्या व्यक्तिमध्ये सकारात्मक दृष्टीकोन विकसित होतो आणि तुम्ही भविष्यातील आव्हानांचा आणि स्पर्धात्मक युगाचा सामना करण्यासाठी सक्षम होता.
आयुष्य कशासाठी आहे? आयुष्य कसे जगायचे? याचा एक दृष्टीकोन असला पाहिजे. आपल्या आयुष्य एकदाच मिळते. ते म्हणतात ना, ’मरावे परि किर्तीरुपे उरावे.’ हा दृष्टीकोन मूल्य शिक्षणाचे प्राप्त होतो. त्याद्वारे आपण जीवनाचा उद्देश जाणून घेऊ शकतो आणि जीवन जगण्याची उत्कृष्टता आत्मसात करु शकतो.
समाजात वावरताना आपण कसे वावरायला हवे. काही लोकांना पाहून आपण सहज म्हणून जातो, ’अरे ह्याला सिविक सेन्स नाही.’ कारण त्याला कसे वागायचे हे कळत नाही. कारण त्याला मूल्य शिक्षण (Importance of Value Education) म्हणजे काय हेच माहित नसतं. मूल्य शिक्षण घेतलेली व्यक्ती इतरांप्रती अधिक जबाबदारीने वागते आणि त्या व्यक्तिमध्ये समजूतदारपणा येतो. ते माणूस म्हणूस अधिक जबाबदार आणि संवेदनशील होतात.
मूल्य शिक्षणाचे (importance of value education) आणखी एक महत्व म्हणजे मुलामध्ये कर्तव्याची भावना उत्पन्न होते. या कर्तव्याच्या भावनेतून जबाबदारी पार पाडण्यास बळ मिळते. जबाबदारीची जाणीव होते.
अध्यात्मिक विकासात आणि आर्थिक संतुलन या दोन्ही गोष्टींना जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. ईश्वराने निर्माण केलेल्या विश्वाबद्दल चांगली भावना मनात निर्माण होते आणि त्या मूळ तत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु होतो. आर्थिक संतुलन असेल तर माणसाला त्याच्या चांगल्या-वाईटाची समज होते. यामध्ये मूल्य शिक्षणाचा मोठा वाटा आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.