दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होत असताना चलनात १००० रुपयांच्या नोटा पुन्हा एकदा येणार असल्याची चर्चा सुरू आहे, याविषयी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा खुलासा केला आहे.
३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या ८७ टक्के नोटा परत आल्या आहेत, तर मुदत संपल्यानंतर विभागीय कार्यालयात अनेकांनी 2 हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या. तरीही बाजारात १० हजार कोटी रुपयांच्या नोटांचा ताळमेळ लागत नसल्याचे समोर आले आहे.
RBI is not in consideration of the re-introduction of Rs 1000 note: Sources
— ANI (@ANI) October 20, 2023
१००० रुपयांची नोट पुन्हा चलनात आणण्याच्या कोणत्याही विचारात आरबीआय नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. १००० रुपयांची कोणतीही नवीन नोट जारी करण्याचा विचारही आरबीआयने केला नाही. याविषयी ANI वृत्तसंस्थेने याविषयी ट्विटरवर माहिती दिली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, बाजारात रोखीचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी सरकारने ५०० रुपयांच्या नोटा छापल्या आहेत. जेणेकरून लोकांना रोख रकमेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. डिजिटल पेमेंटच्या वापरामुळे लोकांमध्ये रोख रकमेची गरज कमी झाली आहे. अशा परिस्थितीत १००० रुपयांच्या नोटा आणण्याची गरज असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने लोकांना अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.