तुम्हाला म्हाडाचं घर हवंय? मग ही बातमी वाचा

88

स्वतचे हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. ते स्वस्तात मिळवण्यासाठी अनेक जण म्हाडाच्या लॉटरीची वाट नेहमीच बघत असतात. आता तुमचे हे स्वप्न साकार होऊ शकते. ​म्हाडाच्या कोकण मंडळाच्या कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी २३ ऑगस्टपासून सोडत जाहीर करण्यात आली आहे.

कधी निघणार सोडत?

ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ २४ ऑगस्ट रोजी वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत होणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ बातमी मिळावी या अनुषंगाने सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत १४ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे.

(हेही वाचाः ९ वर्षाच्या मुलाची फोर्ब्जच्या यादीत हॅट्रिक)

असा भरा अर्ज

अर्जदारांना सोडतीत सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त राहील. अर्ज नोंदणीची सुरुवात २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून होणार आहे. नोंदणीकृत अर्जदार २४ ऑगस्ट रोजीच दुपारी ३ पासून ऐच्छिक सदनिकेकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात करू शकतील. इच्छुक अर्जदार २२ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करू शकतील. अर्जदारांना २३ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. अनामत रकमेच्या ऑनलाइन स्वीकृतीकरिता अंतिम दिनांक व वेळ २४ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत असणार आहे. ऑनलाइन बँकेत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा २४ सप्टेंबरच्या रात्री ११.५९ पर्यंत अर्जदारांना करता येणार आहे.

अशी आहे प्रक्रिया

२३ ऑगस्ट- जाहिरात
२४ ऑगस्ट- दुपारी १२ वाजल्यापासून नोंदणी
२४ ऑगस्ट- दुपारी ३ वाजल्यापासून अर्जविक्री-स्वीकृती
२३ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार
२४ ऑगस्ट- अनामत रकमेसह अर्ज बँकेकडे सादर करण्याची अंतिम तारीख
१४ ऑक्टोबर- काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत

(हेही वाचाः कोकणात जाणा-यांसाठी राणे सोडणार फुकट ट्रेन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.