‘अशी’ असेल अकरावीची प्रवेशप्रक्रिया! 

अखेर राज्य सरकारने अकरावीची नव्याने प्रवेशप्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रवेशप्रक्रिया कशी असेल, याचा शासननिर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.

124

कोरोनामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत, तर राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक व अमरावती या सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. शालेय शिक्षण खात्याने यंदाच्या वर्षी अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबई  उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केल्यावर अकरावी प्रवेशप्रक्रिया कशी राबवणार, अशी चर्चा सुरु झाली होते. अखेर राज्य सरकारने नव्याने प्रवेशप्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रवेशप्रक्रिया कशी असेल, याचा शासननिर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.

अशी होणार प्रवेशप्रक्रिया! 

  • १४ ते २८ ऑगस्ट  – राज्यातील, मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग १ भरायचा आहे. या दरम्यान विद्यार्थी अर्जात बदल करू शकतात. विद्यार्थी कोट्यामधून प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
  • १७ ते २२ ऑगस्ट – कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्याकडील एकूण जागा फलकावर प्रसिद्ध कराव्या लागणार. अर्जाचा भाग २ भरावा लागणार आहे. नवीन विद्यार्थीही अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरू शकतात. विद्यार्थी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाला कोणत्या कोट्यातून प्रवेश घ्यायचा हे सांगू शकतात.
  •  २३ ते २४ ऑगस्ट – पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. गुणवत्ता यादीबाबत आक्षेप नोंदवता येतील. शिक्षण उप संचालक त्यांची निरसन करतील.
  • २५ ऑगस्ट – पहिली अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार.
  • २५ ते २६ ऑगस्ट – गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. प्रवेशप्रक्रिया सुरु होईल.
  • ३० ऑगस्ट  – प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा महाविद्यालये प्रसिद्ध करतील.
  • ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर – प्रवेशाची २ री फेरी (तपशील त्यावेळी जाहीर होईल)
  • ५ ते ९ सप्टेंबर – प्रवेशाची तिसरी फेरी (तपशील त्यावेळी जाहीर होईल)
  • १२ ते १७ सप्टेंबर – प्रवेशाची चौथी फेरी (त्यावेळी तपशील जाहीर होईल.)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.