फेसबुक युजर्ससाठी महत्त्वाची अपडेट; १ डिसेंबरपासून होणार मोठा बदल!

समाजमाध्यमांचा वापर अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फेसबुक हे सर्वात मोठे मेसेजिंग, मित्र-मैत्रिणींना कनेक्ट करणारे अ‍ॅप आहे. १ डिसेंबरपासून फेसबुकमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होणार असून या बदलानंतर तुमच्या प्रोफाइलमध्ये बदल होतील. या फेसबुक अपडेटविषयी सविस्तर जाणून घेऊया…

( हेही वाचा : स्वस्त मस्त BEST! मुंबईत फक्त ९ रुपयात ५ फेऱ्यांचा बस प्रवास, असणार ‘ही’ एकच अट)

१ डिसेंबरपासून फेसबुकमध्ये होणार बदल

१ डिसेंबरनंतर तुम्हाला तुमच्या फेसबुक प्रोफाइलवर धार्मिक विचार, पत्ते आणि राजकीय विचार यांसारख्या गोष्टी बायोमध्ये दिसणार नाहीत.

या बदलांबाबत फेसबुकचे सोशल मिडिया कन्सल्टंट मॅट नवरा (Matt Navarra) यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. १ डिसेंबर २०२२ पासून फेसबुक युजर्सच्या प्रोफाईलमधून धार्मिक दृष्टिकोन (Religion View) आणि स्वारस्य (Interested In) यांसारख्या दोन गोष्टी हटवण्यात येणार आहेत.

सर्वात आधी फेसबुक प्रोफाईल बनविण्यासाठी खूप वेळ लागायचा संपूर्ण माहिती विस्तृतपणे भरावी लागायची परंतु आता फेसबुकमध्ये अनेक बदल होत आहेत. मेटा प्रवक्ते एमिल वाझक्वेझ यांनी सांगितले की, फेसबुक वापरणे लोकांना सोपे आणि सोयीस्कर व्हावे यासाठी प्रोफाइल सेक्शनमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.

फेसबुकने त्यांच्या प्लॅटफॉर्मला सोपे करण्यासाठी प्रोफाईल सेक्शनमधून काही डिटेल माहितीला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आताही फेसबुकमध्ये खूप अशा गोष्टी आहेत, ज्यांचा वापर केला जात नाही. त्यामुळेच नव्या अपडेटनुसार बायो सेक्शन सोपा केला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here