रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट! पुण्याहून दक्षिणेकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

97

सोलापूर रेल्वे विभागात भिगवण – वाशिंबे दरम्यान ‘एनआय’चे (नॉन इंटरलॉकिंग) काम केले जाणार आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे.

( हेही वाचा : फक्त १४९९ रुपयांमध्ये करा हवाई प्रवास! ‘या’ विमान कंपनीची शानदार ऑफर)

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

  • ४ ते ८ ऑगस्ट दरम्यान रद्द झालेल्या गाड्या
    मुंबई-गदग एक्स्प्रेस, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस.
  • ५ ते ९ ऑगस्ट दरम्यान रद्द करण्यात आलेल्या गाड्या

पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस,चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस, कन्याकुमारी-पुणे एक्स्प्रेस, पुणे-कन्याकुमारी एक्स्प्रेस, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेस, कोइम्बतुर-राजकोट साप्ताहिक एक्स्प्रेस,लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्स्प्रेस ओखा-तुतिकोरीन साप्ताहिक एक्स्प्रेस, सिकंदराबाद-राजकोट त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-कराईकल साप्ताहिक एक्स्प्रेस, काकीनाडा पोर्ट-लोकमान्य टिळक टर्मिनस, भावनगर टर्मिनस-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस, जयपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस, इंदूर-लिंगमपल्ली, अहमदाबाद-चेन्नई साप्ताहिक एक्स्प्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अहमदाबाद-चेन्नई साप्ताहिक एक्स्प्रेस, पुणे-कन्याकुमारी एक्स्प्रेस रद्द.

  • ३ ऑगस्ट रोजी धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस-मदुराई, काकीनाडा पोर्ट-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी रद्द.
  • हैदराबाद-हडपसर-हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी कुर्डुवाडी स्थानकापर्यंत रद्द राहणार आहे. मुंबई-बेंगळुरू-मुंबई उद्यान एक्स्प्रेस सोलापूर स्थानकापर्यंत धावेल. नांदेड- पनवेल एक्स्प्रेस कुर्डुवाडी स्थानकापर्यंत धावेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.