मुंबईसह राज्यातील अनेक रुग्णालयांसह प्रसुतीगृहांमध्ये आगीसारख्या दुर्घटना घडून आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे बऱ्याचदा रुग्णांचा गुदमरुन मृत्यू होण्याचा प्रकार घडत असल्याने महापालिकेने आता आपल्या सर्व रुग्णांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता शिवडीतील टी. बी रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयातील ओपीडीसह आयसीयू ओपीडी, आयसोलेशन वॉर्ड, बर्न ओटी आदी भागांमध्ये अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. (Mumbai Municipal Hospital)
महानगरपालिकेचे टी. बी. रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालय ही बाह्यरुग्णांना वैद्यकिय सेवा पुरविणारी महत्वाची रुग्णालये आहेत. या रुग्णालयांतील विविध विभागांमध्ये तसेच वैद्यकीय कक्षांमध्ये, अति दक्षता विभागात विविध यांत्रिक व विद्युत प्रणाली कार्यरत आहेत. यांत्रिकी व विद्युत प्रणाली कार्यरत असताना व रुग्णालयातील इतर विद्युत उपकरणे कार्यान्वीत असताना त्यात बिघाड झाल्यास, आग लागण्याची शक्यता उद्भवू शकते. अशावेळी तेथील रुग्ण तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. (Mumbai Municipal Hospital)
(हेही वाचा – Excise Policy of Delhi : ‘आम आदमी पार्टी’ गोत्यात येण्याची शक्यता; ईडी आणि सीबीआयकडून चौकशी)
त्यामुळे आग लागल्यानंतर रुग्णालयातून रुग्ण व कर्मचाऱ्यांना बाहेर काढणे अवघड होते. अशा परिस्थितीत बऱ्याच लोकांचा मृत्यु हा धूरामुळे श्वास गुदमरुन होतो. त्यामुळे टी. बी. रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयातील सी. व्ही. टी. एस. इमारतीत असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभाग, अतिदक्षता विभाग, बर्न ओटी, वॉर्ड १४ (आयसीयु), आयसीयु ओपीडी, पीसीआर लॅब, आयसोलेशन वॉर्ड इत्यादी ठिकाणी आग लागून झालेला धूर शोधक व गाळुन बाहेर काढण्याच्या प्रणालीला बसवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. (Mumbai Municipal Hospital)
तब्बल दोन्ही रुग्णालयांमध्ये ही आग प्रतिबंधक उपाययोजनांची प्रणाली बसवण्यासाठी १२.५७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या दोन्ही कामांसाठी मॅक एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली असून पुढील सहा महिन्यांमध्ये ही प्रणाली दोन्ही रुग्णालयांमध्ये बसवली जाणार आहे. (Mumbai Municipal Hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community