उकडतंय म्हणून मोकळी हवाही मुंबईकर घेऊ शकत नाहीत, का ते वाचा

139

होळीच्या आधीच मुंबईकरांना उन्हाच्या झळा पोहोचत आहेत. मागच्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेत उष्णता पसरली आहे. पण, मुंबईच्या हवेत नुसती उष्णताच नाही, प्रदूषणही मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईतील हवेचा दर्जा वाईट स्थितीपर्यंत नोंदवला गेला आहे. त्यामुळे उकडतंय म्हणून, मुंबईकर मोकळ्या हवेत श्वासही घेऊ शकत नाहीत.

हवेतील आद्रताही वाढली

मुंबई शहरात रविवारी 36.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने कोकणात ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. तरीही दिवसभरातील कमाल तापमान चढलेलेच होते. सांताक्रुझमध्ये 36.3 तर कुलाब्यात 32.2 अंश तापमानाची नोंद झाली. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. हवेतील आद्रताही वाढली आहे.

माझगावची स्थिती वाईट

मुंबईतील हवेचा दर्जा वाईट नोंदला गेला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक 235 सह मुंबईतील प्रदूषण कायम असल्याचे दिसले. त्याचवेळी अंधेरी, मालाड आणि माझगावमधील स्थिती वाईट नोंदवली गेली. भांडुप, वरळी, बोरिवली, बीकेसी आणि चेंबूरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक 200 च्या आत असून, त्याची मध्यम नोंद झाली आहे.

( हेही वाचा एसटीच्या बडतर्फ कर्माचा-यांना महामंडळाचे आवाहन, म्हणाले…)

अतिशय वाईट हवा

माझगाव 331
मालाड 326
अंधेरी 301

हवेचा दर्जा वाईट

कुलाबा 211
नवी मुंबई 218

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.